मुंबई-गोवा महामार्गावर डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक, महिलेचा जागीच मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on
Updated on

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा येथे ओव्हरटेक करणाऱ्या डंपरचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी 7.30 वा. घडली.

कल्पिता किशोर घडशी (52, रा. नाणीज घडशीवाडी, रत्नागिरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ती दत्ताराम नारायण दरडी (रा. रेल्वेस्टेशन, रत्नागिरी ) याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून नाणीज ते रत्नागिरी येत होती. ते हातखंबा येथील गद्रे पेट्रोल पंपाच्या खालील बाजूस आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना डंपरचा धक्का लागून हा अपघात झाला. यात कल्पिता घडशी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरु होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news