पणजी : पुढारी वृत्तसेवा : प्रेम संबंधातून ठेवण्यात आलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही, असा निर्वाळा देऊन फोंडा येथील सत्र न्यायालयाने प्रेमानंद गावकर नामक संशयितास निर्दोष ठरवले आहे.
संबंधित बातम्या :
तो ज्या कंपनीत काम करत होता. त्या कंपनीत त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध जडले होते. तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. पण संशयिताचे दुसऱ्या एका मुली बरोबर लग्न ठरल्याचे समजतात या युवतीने पोलीस स्टेशनला जाऊन बलात्काराची तक्रार दिली होती.
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड समितीच्या कलम ३७६, व ४२० खाली गुन्हा नोंदवून दि. २३ मार्च २०१६ रोजी सदर संशयिताला अटक करून नंतर आरोपपत्र सादर केले होते. फेब्रुवारी २०१५ ते १६ नोव्हेंबर २०१५ यादरम्यान सदर संशयिताने अनेक वेळा बलात्कार केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणावरील सुनावणी गेली सात वर्षे सुरू होती. तक्रार देणाऱ्या त्या युवतीचेही आता लग्न झाले आहे. आपले प्रेम संबंध होते आणि लग्न करत नसल्यामुळे आपण तक्रार दिली हे तिने न्यायालयात मान्य केले. यावेळी निवाडा देताना प्रेम संबंधात ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही, असा निर्वाळा देऊन सदर संशयिताला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
हेही वाचा :