पुढारी ऑनलाईन डेस्क : पतीला दीर्घकाळ शरीरसुख नाकारणे म्हणजे कौर्यच आहे, असे मत नोंदवत ओडिसा उच्च न्यायायाने घटस्फोटाला (Divorce ) मंजुरी दिली आहे. न्यायमूर्ती अरिंदम सिन्हा आणि सिबो मिश्रा यांच्या पीठाने हा निकाल दिला आहे. निकालात म्हटले आहे की, "कोणत्याही वैध आणि शारीरिक कारणांशिवाय जर दीर्घकाळ शरीरसुख नकारले असेल तर मानसिक कौर्य आहे. यात प्रतिवादी पत्नीने एकतर्फी निर्णय घेत दीर्घकाळा पतीशी संबंध ठेवलेले नाहीत." ही बातमी बार अँड बेंच या वेबसाईटने दिली आहे.
या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने पतीचा घटस्फोट (Divorce) मागणीचा अर्ज फेटाळला होता, त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या संदर्भात प्रतिवादी पत्नीच्या वकिलांनी याचिकाकर्ता पतीने Non – Consummationच्या आधारी जी दाद मागितली आहे, ती विहित वेळेत मागितलेली नाही असा मुद्दा मांडला. पण पत्नीची उलट तपासणी घेतली असता त्यात तिने नवऱ्याशी संबंध ठेवले नसल्याची कबुली दिली होती.
पण नवरा बायकोत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नसल्याचे कोर्टाने मान्य केले, तसेच या परिस्थितीत नवऱ्याने संबंध प्रस्थापित होण्यासाठी वाट पाहिली यामुळे त्याला दोषी धरता येणार नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. नवऱ्याला शरीरसंबंध नकारण्याचा पत्नीचा निर्णय हा एकतर्फी होतो, असे न्यायालयाने नमुद केले आहे.
हेही वाचा