DRDO : मानवरहित रणगाडा, बोट, रोबोटिक श्वान अन् शत्रूंचा वेध घेणारे ड्रोन! | पुढारी

DRDO : मानवरहित रणगाडा, बोट, रोबोटिक श्वान अन् शत्रूंचा वेध घेणारे ड्रोन!

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) च्या वतीने आयोजित प्रदर्शनात देशभरातील स्टार्टअपने आजवर न पाहिलेली उत्पादने ठेवली आहेत.यात मानवरहित रणगाडा,चार पायाचा रोबोटीक श्वान,शत्रूंचा वेध घेणारे ड्रोणने लक्ष वेधले आहे. पाषाण भागातील डीआरडीओच्या प्रांगणात देशातील विविध भागांतून स्टार्टअपने तयार केलेली संरक्षणासाठी लागणीरी उत्पादने ठेवली आहेत.याचे उदघाटन शुक्रवारी झाले तर शनिवारी प्रदर्शनाचा समारोप झाला.यात चार पायाचा रोबोटीक श्वान (कुत्रा) अतिरेकी हल्ला झाला तर कसे काम करतो हे तेथे पाहावयास मिळाले.

पुण्यातील कंपनीने तयार केलेला मानवरहित रणगाडा या ठिकाणी आहे. हा रणगाडा रिमोटवर चालतो. शत्रूसमोर जाताना तो रिमोटने हाताळता येतो तसेच रेडिओ लहरीची अनेक उपकरणे,ड्रोनचे विविध प्रकार या ठिकाणी दिसले. या ठिकाणी मानवरहित बोट दिसली. ही बोट समुद्रात रिमोटने फिरवता येते तसेच रोबोटीक पाणबुडीने धरणाचा अभ्यास करता येतो. या पाणबुडीने पुण्यातील खडकवासला धरणाचा अभ्यास केला असून, काही सूचना जलसंपदा विभागाला दिल्या आहेत, तसेच पाण्यातून चालवता येणारे मिसाईल लॉन्चरही प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

हेही वाचा :

Back to top button