

पणजी : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज (दि. २२) पणजी येथे इंडिया आघाडीने केंद्र सरकारचा निषेध केला. Suspension of MP
काँग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्लूस फेरेरा व एल्टन डिकोस्टा यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक अॅड. अमित पाटकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य प्रमुख जतीन कामत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्य अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक आदीनेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. खासदारांचे निलंबन हा लोकशाहीचा खून असल्याचे पाटकर यांनी सांगितले. Suspension of MP
हेही वाचा