Uttarkashi tunnel rescue : उत्तरकाशी बोगद्यातील बचाव पथकात गोव्यातील दोघांचा सहभाग; राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव | पुढारी

Uttarkashi tunnel rescue : उत्तरकाशी बोगद्यातील बचाव पथकात गोव्यातील दोघांचा सहभाग; राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी: उत्तराखंडा राजातील उत्तरकाशी येथे बोगदा (टनल) कोसळून त्यामध्ये अडकलेल्या 41 कामगारांना तब्बल 17 दिवसानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. आणि देशभरातील नागरिकांची ताणलेली उत्सुकता एकदाची संपली. या बचाव कार्यात अमोघ गुडेकर व आशीफ मुल्ला या दोघा गोमंतकिय युवकांचा सहभाग होता. त्यामुळे राज्यभरातून या दोघा गोमंतकीय युवकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Uttarkashi tunnel rescue

फोंडा येथील अमोघ गुडेकर व उसगाव तिस्क येथील आसिफ मुल्ला हे दोघे बंगळूर येथे खाण व भूगर्भ अभियंते म्हणून नोकरी करतात. उत्तरकाशीत बोगदा कोसळून 41 कामगार त्यात अडकल्यानंतर बचाव पथके तयार केली गेली होती. त्यात खाण भूगर्भ अभियंत्याचे पथक सामील झाले या पथकात गडेकर व मुल्ला यांचा समावेश होता. Uttarkashi tunnel rescue

याबाबत अमोघ गडेकर यांनी सांगितले की, हा आपल्या जीवनातील एक आनंदाचा अच्युत असाच क्षण आहे, आपण जे शिक्षण घेतले त्याचा उपयोग तब्बल 41 कामगारांचे जीव वाचवण्यासाठी झाला, ही मोठी गोष्ट आहे. गोवेकर कुठलेही काम करण्यात कमी नाहीत, हे आम्ही दाखवून दिल्याचे गडेकर म्हणाले. आम्ही ड्रोनच्या सहाय्याने रेकार्ड केलेला डाटा कामगारांना बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरल्याचे सांगून ही आमच्या आयुष्यातील मोठी कामगिरी असल्याचे गडेकर यांनी सांगितले.

तर आसीफ मुल्ला यांने सांगितले की आम्ही बचाव कार्यात सहभागी झालो. त्यावेळी तेथे 11 डिग्री सेल्सिअस इतके तापमान होते. प्रचंड थंडीतही सर्व बचाव पथकांनी प्रयत्नांची शर्थ करून 41 कामगारांना वाचवले. त्यामुळे बचाव पथके व वाचलेली कामगारही आनंदी झाले. ही घटना कधीही न विसरणारी असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button