Uttarkashi tunnel rescue : ४१ कामगारांना घेऊन चिनूक हेलिकॉप्टर रवाना, ऋषिकेश येथील AIIMS मध्ये वैद्यकीय तपासणी होणार | पुढारी

Uttarkashi tunnel rescue : ४१ कामगारांना घेऊन चिनूक हेलिकॉप्टर रवाना, ऋषिकेश येथील AIIMS मध्ये वैद्यकीय तपासणी होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना मंगळवारी (दि.२९) रात्री सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज दुपारी कामगारांना  पुढील वैद्यकीय तपासणीसाठी हवाई दलाचे चिनूक हेलिकॉप्टरमधून ऋषिकेश येथील एम्स रूग्णालयात नेण्यात आले आहे. कामगारांना बाहेर काढल्यानंतर चिन्यालिसौर येथील रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. Uttarkashi tunnel rescue

देशभरात १२ नोव्‍हेंबर २०२३ रोजी दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सियालक्‍यारा बोगद्याचे प्रवेशद्वारापासून सुमारे २०० ते ३०० मीटर आत स्‍लॅब कोसळला. यामुळे बोगद्यात  ४१ कामगार  अडकले. यानंतर सलग १७ दिवस राबवलेल्‍या गेलेल्‍या अथक मदतकार्याच्‍या जोरावर सर्व कामगारांची सुटका करण्‍यात मंगळवारी (दि. २८ ) यश आले.   आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ४१  कामगारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

 Uttarkashi tunnel rescue : त्यांच्या धैर्याने आणि संयमाने सर्वांना प्रेरणा दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२९) उत्तराखंडमधील सिल्कियारा बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांच्या  आरोग्याची विचारपूस केली आणि त्यांना प्रोत्साहनही दिले. बचावकार्य यशस्वी करणाऱ्या सैनिकांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “त्यांच्या शौर्याने आणि दृढनिश्चयाने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण ठेवले आहे.” त्यांच्या धैर्याने आणि संयमाने सर्वांना प्रेरणा दिली आहे.  आमचे हे मित्र प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत ही खूप समाधानाची बाब आहे.’

हेही वाचा 

Back to top button