National Games 2023 Goa : यंडपाड्यातील बाबूची आकाशाला गवसणी, गोव्याला दिले पहिले सुवर्ण पदक

बाबू उर्फ अभय गावकर
बाबू उर्फ अभय गावकर

मडगाव

नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील यंडपाडा हा डोंगरमाथ्यावर वसलेला गाव आहे. आताच कुठे या गावात वीज आणि रस्ता पोहोचलेला आहे. आधुनिक अशा कोणत्याच साधनसुविधा या पाच घरांच्या खेड्यात उपलब्ध नाहीत. (National Games 2023 Goa) अशिक्षित आई-वडील ज्यांना शेती शिवाय आणखी उत्पन्नाचा स्त्रोत्र नाही. अत्यंत गरीब परिस्थितीही बाबू उर्फ अभय गावकर याने आकाशाला गवसणी घातली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बाबू या युवकाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. संपूर्ण गोव्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. (National Games 2023 Goa)

संबंधित बातम्या –

गोव्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पंथेलॉन प्रकारात गोव्याला प्रथम सुवर्णपदक प्राप्त करून दिलेल्या सांगेच्या नेत्रावळी येथील बाबू गावकर याच्यावर बक्षिसांचा वर्षांव सुरू झाला आहे. सांगेचे आमदार आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बाबू गावकर याला एक लाख रूपयांचे वैयक्तिक बक्षीस जाहीर केले आहे. नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील यंडपाडा वार्गण या डोंगराळ भागांतील एका छोट्याश्या वस्तीतून वर आलेल्या बाबूने प्रतिकूल परिस्थितीवर करत गोव्याला पाहिले सुवर्णपदक प्राप्त करुन दिले आहे.

बाबूचे आई-वडील
बाबूचे आई-वडील

यंडपाडा हा गाव तुडव या वस्तीला लागून आहे. गोवा कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या डोंगराळ भागातील आदिवासी गावांपैकी हा एक गाव आहे. बाबूचे आई-वडील शेती करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. बाबूला एक विवाहित बहिण आहे. या डोंगराळ भागात बऱ्याच हाल सहन करत त्याने पदवी संपादन केली आहे.

समस्त सांगे वासीयांनी त्याचा अभिमान असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. त्याच्याकडून गोव्याला आणखीही बक्षिसाची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news