Heavy Rain : गोव्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता | पुढारी

Heavy Rain : गोव्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पणजी : राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने 30 पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात 1 जून ते 28 सप्टेंबर या काळात राज्यात 126.18 इंच पाऊस नोंद झाला आहे. (Heavy Rain)

सरासरीपेक्षा हा पाऊस 7 टक्के जास्त आहे. हवामान विभागाने जारी केलेला ऑरेंज अलर्ट 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. 15 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात पावसाने दडी मारली होती. मात्र 11 सप्टेंबरपासून पावसाच्या सरी पुन्हा कोसळण्यास सुरुवात झाली. सध्या सुरू असलेला पाऊस भातशेतीसाठी हानिकारक असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Heavy Rain)

हेही वाचा : 

 

Back to top button