कोल्हापूर : ‘भोगावतीच्या वार्षिक सभेत एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा…’ : स्वाभिमानीचे आवाहन | पुढारी

कोल्हापूर : 'भोगावतीच्या वार्षिक सभेत एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा...' : स्वाभिमानीचे आवाहन

राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : भोगावती साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये आरोप-प्रत्यारोप करून एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा भोगावती कसा वाचेल? याबाबत विचार व्यक्त करून कृतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.जालंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले की, भोगावती अर्थिक अडचणीत आहे. कारखाना वाचविण्याची गरज आहे. कारखान्याच्या सद्य स्थितीला स्वाभिमानी सोडून सर्वजण जबाबदार आहेत. त्यामुळे वार्षिक सभेला येऊन एकमेकांच्या कारभाराची उणीधुणी काढण्यापेक्षा कारखाना वाचविण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा होणे महत्त्वाचे आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी कारखान्याचा वार्षिक अहवाल चुकीचाच आहे, असे म्हणत मागील सुमारे आठ कोटीची ऊसबिलाची देणी  व ६२ महिन्याची सभासदांची साखर देण्याची मागणी करत कारखान्यातील विविध कारभारावर टीका केली. यावेळी रावसो डोंगळे, आण्णापा चौगले, विलास पाटील, रमाकांत तोडकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button