Heavy rain in Mumbai: सावधान! मुंबईसह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा | पुढारी

Heavy rain in Mumbai: सावधान! मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईत गेल्या एक तासांपासून विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू आहे. दरम्यान, पुढील 3-4 तासांत हा  मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर पट्ट्यात पावसाच्या मध्यम ते तीव्र सरी सुरूच राहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. या संदर्भातील माहिती मुंबई हवामान विभागाने ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे. (Heavy rain in Mumbai)

पूर्वेकडून तीव्र वादळी वारे मुंबईच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या काही भागात पूर येण्याची शक्यता देखील मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Heavy rain in Mumbai)

गुरुवारी दुपारपासून मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दुपारी ३ वाजताच्या आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये गुरुवार (दि.२८) आणि शुक्रवारसाठी(दि.२९) मुंबईला यलो अलर्ट दिला आहे. येत्या २४ तासांत शहरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना २८, २९ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने पुढील दोन राज्यातील बहुतांशी भागात यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान गुरूवार, २८ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर शुक्रवारी, २९ सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, पुढील दोन दिवस या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button