

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात आयोजित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्या तरी स्पर्धेचे विधीवत प्रत्यक्ष उद्घाटन २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ही माहिती दिली.
२५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर असा कालावधी पुर्वी ठरवण्यात आला होता. मात्र अनेक मैदानांवर चार ते पाच क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातच दि. १२ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होणार असल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना दि.१८ ऑक्टोबर पासून सुरुवात करण्याचे निश्चित झाले आहे. २६ ऑक्टोबरला फातोर्डा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जय्यत तयारी सरकारने सुरु केलेली आहे. स्पर्धेवर सुमारे ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असेही गावडे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (दि. २५) पणजीत क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या मैदानांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा :