गोव्याचे तानावडे यांनी राज्‍यसभेत घेतली मराठीतून शपथ | पुढारी

गोव्याचे तानावडे यांनी राज्‍यसभेत घेतली मराठीतून शपथ

पणजी, पुढारी वृत्तसेवा : विठ्ठल गावडे पारवाडकर भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज राज्यसभेमध्ये शपथ घेतली. महत्त्वाचे म्हणजे ही शपथ त्यांनी मराठी भाषेमधून घेतली. गोव्यात कोकणी राजभाषा व मराठीसह राजभाषा आहे. त्यामुळे गोव्यातील मराठीप्रेमीमध्ये आनंद केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले सदानंद तानावडे हे पूर्वीपासून मराठीप्रेमी आहेत, त्यांचेच नव्हे तर बहुतांश गोव्यातील जेष्ठ आमदारांचे व विशेषतः उत्तर गोव्यातील आमदारांचे प्राथमिक शिक्षण हे मराठीतून झालेले आहे. उत्तर गोवा हा मराठीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मराठी ही गोव्याची संस्कृतीक भाषा आहे. हजारो वर्षांची परंपरा तिला आहे. व्यवहारात तिचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे सर्व लक्षात घेऊन तानावडे यांनी आज राज्यसभेत मराठीतून शपथ घेतली असावी असा कयास व्यक्त होत आहे.

तानावडे हे थीवी मतदारसंघातून २००२ साली भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. मात्र दुसऱ्यांदा त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारून ती किरण कांदोळकर यांना दिली . तरी तानावडे यांनी बंड न करता पक्षासाठी काम करत राहिले. शेवटी त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्ष दिले. ते अध्यक्ष असताना गोव्यात भाजपने पंचायती, पालिका, जिल्हा पंचायत आणि विधानसभा या सर्वच निवडणुकांमुळे एकहाती विजय मिळवला. त्याची शाबासकी म्हणून पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले.

राज्यसभेमध्ये मराठीतून शपथ घेत असताना महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा खासदारांसह सर्वच राज्यसभा खासदार आणि राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपतीही कुतुहलाने तानावडे यांच्याकडे पाहत होते. एक तळागाळातील भाजपचा कार्यकर्ता राज्यसभा खासदार झाला.

.हेही वाचा  

कोल्‍हापूर : गारगोटी-वेंगरूळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

Goa Assembly Monsoon session : गोवा विधानसभेमध्ये धक्काबुक्की; विरोधी आमदार दोन दिवसांसाठी निलंबित

गोव्यात मुसळधार पाऊस! पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट, पंचवाडी धरण ओव्हरफ्लो | Goa Heavy Rain

Back to top button