गोवा : निराधार महिलेला गुंडांकडून बेदम मारहाण, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू | पुढारी

गोवा : निराधार महिलेला गुंडांकडून बेदम मारहाण, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : मडगावात गुंडागिरीने पुन्हा तोंड वर काढले आहे. मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या एका गरीब आणि निराधार महिलेला मारहाण करत रस्त्यावर फेकुन दिल्याची घटना स्टेशन रोडवर घडली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान घडली आहे. रेणुका बहादूर असे मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ही महिला मध्यरात्री जेवण आणण्यासाठी आली होती.

बेकायदेशीरपणे दारु विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तिघा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी तिची छेड काढत तिला जबर मारहाण केली. एवढ्यावर न थांबता तिच्या अंगावर कुत्रा देखील सोडला. माणूसकिला काळीमा फासणाऱ्या या घटनेत रेणुका हिची अवस्था अतीशय गंभीर बनली असून तिच्यावर मडगावच्या जिल्हा रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिकची माहिती अशी की, रेणुका ही मूळ गदक कर्नाटक येथील राहिवाशी आहे. बऱ्याच वर्षापूर्वी पतीचे निधन झाले होते. दरम्यान, कामाच्या शोधात ती गोव्यात आली होती. तिला रुपा (वय १७) आणि अभिषेक (वय १३) अशी दोन मुले आहेत. रुपा ही इयत्ता अकरावी शिकत आहे. ते अभिषेक हा आठवीत शिकत आहे. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलण्यासाठी रेणुका मिळेल ती कामे करत होती. रेणुका हिचे कुटुंब जुन्या स्टेशन रोड परिसरातील झोपडपट्टीत भाड्याने रहात आहे.

सोमवारी मध्यरात्री ती जवळच असलेल्या एका हॉटेलवर जेवण आणण्यासाठी गेली होती.वाटेत बेकायदेशीर पणे चालणाऱ्या मथुरा नामक दारुच्या दुकानासमोर सुजित कुमार सिंग आणि सुनिल कुमार सिंग यांनी तिची छेड काढली. पण तिने प्रतिसाद न दिल्याने दोघांनीही त्यांना दांडा आणि लथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या बारमध्ये काम करणाऱ्या दिपू यांनेही तिला मारहाण केली. या जबर मारहाणीत रेणुका हिचा हात ,हाताची बोटे आणी पाय मोडला आहे.तिला मारहाण करून या तिघांनी तिच्यावर कुत्राही सोडला.

हेही वाचलतं का?

Back to top button