Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant

गोवा : मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची भेट

Published on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची भेट घेतली. गोव्यातील ताज कन्व्हेंशन सेंटर येथे ही भेट झाली. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेनेचे सर्व ३९ आमदार व इतर अपक्ष आमदार ताज कन्व्हेंशन सेंटर येथे दाखल झाले आहे. यानंतर रात्री उशिरा साडेअकराच्या दरम्यानच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व त्यांचे सर्व सहकारी अपक्षांसह ३९ आमदार बुधवारी (दि.29) रात्री दहा वाजताच्या सुमारास गोव्यातील दाबोळी विमानतळावर दाखल झाले. शिवसेनेवर नाराज होऊन बंडखोर आमदार गुवाहाटी येथे गेले अनेक दिवस राहिले होते. एकनाथ शिंदे व इतर आमदारांच्या सुरक्षेसाठी विमानतळावरील सुरक्षा कडक ठेवण्यात आली होती. सुरुवातीला विमानातून आलेले इतर प्रवासी आपल्या सामानासह विमानतळाच्या बाहेर पडले. त्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार कडक सुरक्षा व्यवस्थेत दोनापावला येथील हॉटेलकडे रवाना झाले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news