पणजी : पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आमदार गोव्यात दाखल होणार आहेत. गुवाहटी येथून ते थेट दाभोळ विमानतळावर येतील अन् त्यानंतर दोनापावला येथील ताज कन्व्हेंशन सेंटर या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. यानंतर उद्या गुरूवारी ते मुंबईकडे रवाना होतील. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांच्या सुरक्षेसाठी गोवा सरकारने दाबोळी विमानतळासह दोनापावला येथील हॉटेलच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले आहेत.
दाबोळी विमानतळावर आमदारांच्या आगमनाची प्रतीक्षा असून पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत. दाबोळी ते दोनापावला हे सुमारे तीस किलोमीटरचे अंतर असून राष्ट्रीय महामार्गावरून हे आमदार सरळ हॉटेलमध्ये दाखल होणार आहेत. त्यावेळी ते पत्रकारांना संबोधित करण्याची शक्यता कमी आहे. तरीसुद्धा राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांच्या पत्रकारासह स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने आमदारांची प्रतीक्षा करत दोनापावला येथे थांबले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील शिवसैनिक गोव्यात येऊ नयेत यासाठी गोवा पोलिसांनी पत्रादेवी नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे.
हेही वाचलंत का?