शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गोव्यात प्रवेश देऊ नका; गोवा प्रदेश काँग्रेसची मागणी | पुढारी

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गोव्यात प्रवेश देऊ नका; गोवा प्रदेश काँग्रेसची मागणी

पणजी; पुढारी व्रुतसेवा : सध्या गोवा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असून, गोवा सरकारने महाराष्ट्रातील आमदारांना गोव्यात आणून त्यांच्यावर पैसा खर्च करू नये, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. आज दिनांक २९ रोजी पणजी येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेच्या ३९ बंडखोर आमदारांसह जे इतर आमदार गुवाहाटी येथे राहिले आहेत, त्यांना गोव्यामध्ये प्रवेश देऊ नये. महाराष्ट्रात जे काय चालले आहे, त्याच्याशी गोव्याचा काही संबंध नाही. मात्र भाजप हा पक्ष त्यांच्या विरोधी पक्षाच्या सत्ता असलेल्या राज्यातील सरकारे अस्थिर करून आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी पाटकर यांनी केला.

महाराष्ट्रातील जे नेते भाजपच्या विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात विविध प्रकारची चौकशी केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गोव्यामध्ये सध्या अनेक समस्या आहेत. सरकारची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे. अशा परिस्थितीत गोव्यात महाराष्ट्राच्या आमदारांना थारा देऊ नये व गोवा सरकारने त्यांच्यासाठी पैसे खर्च करू नयेत असेही पाटकर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

 

Back to top button