गोवा : लुईस बर्जरप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली | पुढारी

गोवा : लुईस बर्जरप्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा समावेश असलेल्या लुईस बर्जर कथित लाचखोर प्रकरणातील सुनावणी सोमवारी विशेष न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणीसाठी हे प्रकरण 15 मार्च रोजी ठेवले आहे.

सोमवारी म्हापसा येथील विशेष न्यायालयात सुनावणी झाली. ज्यात कलम 319 सीआरपीसी अंतर्गत एका संशयिताच्या वकिलाने अर्ज दाखल केला. त्याच्या युक्तिवादासाठी अधिक वेळ दिला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी 15 मार्च रोजी तहकूब केली.

क्राइम ब्रँचने भारतीय दंड संहितेच्या कलम 120बी, 201 अंतर्गत, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7,8,9 आणि 13 अंतर्गत चर्चिल आलेमाव व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, तसेच अधिकार्‍यांसह इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याशिवाय माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि इतरांचा समावेश असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील सुनावणीही न्यायालयाने सोमवारी पुढे ढकलली आहे. हे प्रकरण 15 मार्चला निश्चित केले आहे.

21 जुलै 2015 रोजी, गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोंदवलेल्या पहिल्या माहिती अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button