Goa Election : वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत, भाजपचे संकल्प पत्रातून आश्वासन | पुढारी

Goa Election : वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत, भाजपचे संकल्प पत्रातून आश्वासन

पणजी : पुढारी वृत्तसेवा राज्यातील गृहिणींवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील प्रत्येक घराला वर्षाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन भाजपने आपल्या संकल्पपत्र दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या 22 कलमी संकल्प पत्राचे प्रकाशन मंगळवारी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झाले.

संकल्प पत्रातून सर्व गोमंतकीयांसाठी घरे देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. पात्र कुटुंबांना महिलांसाठी दोन टक्के, तर पुरुषांसाठी चार टक्के व्याजदराने गृहकर्ज देऊन, तसेच निवासी भूखंड विकसित करून पुढील पाच वर्षांत सर्व गोमंतकीयांसाठी चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करून देऊ, असे भाजपने या संकल्प पत्रात नमूद केले आहे.  (Goa Election)

भाजपने नेहमीच गोव्यावर भर दिला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे गोल्डन गोव्याचे स्वप्न, त्यांचा वारसा पुढे नेण्याचे आश्वासन हे संकल्प पत्र देते.हे संकल्प पत्र गोव्याच्या प्रगती आणि समृद्धीसाठी एक दूरदर्शी रोडमॅप आहे. समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचणार्‍या आर्थिक लाभांसह उच्च विकासाचे आश्वासन भाजपने या संकल्प पत्रात दिले आहे.

भाजपचे गोवा संकल्प पत्र हा समाजातील सर्व घटकांना अधिक उन्नत करण्याचे वचन देणारा सर्वसमावेशक जाहीरनामा आहे, असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले.

या सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, यांच्यासह गोवा भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, निवडणूक सहप्रभारी दर्शना जरदोश, जी. किशन रेड्डी, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि भाजप जाहीरनामा समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर, उपाध्यक्ष सुभाष .शिरोडकर आणि इतर नेते उपस्थित होते. (Goa Election)

Koo App

गोवा विधानसभा निवडणूक २०२२ साठीच्या भारतीय जनता पक्षाच्या लोककल्याण संकल्पपत्राचे आज गोव्यात मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व निवडणूक प्रभारी श्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्री श्री जी किशन रेड्डी जी, केंद्रीय राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक जी, दर्शना जरदोश जी, गोवा भाजपचे अध्यक्ष श्री सदानंद तानावडे जी, श्री विनय तेंडुलकर जी यांच्या उपस्थितीत अनावरण केले.

Nitin Gadkari (@nitin.gadkari) 8 Feb 2022

भाजपच्या संकल्पपत्रातील ठळक मुद्दे…

गोव्यातील गृहिणींना सक्षम करणे
वर्षाला तीन सिलिंडर मोफत देणे
सर्व गोमंतकीयांसाठी घरे देणे
इंधन दरात वाढ नाही, वेळोवेळी इंधनाच्या किमतीत कपात करणे
सर्वांसाठी राहण्याची सुलभता वाढवणे
पर्यटनाला ‘युनिकली गोवन’ बनवणे
पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज आणि गोव्यातील स्थानिक रहिवाशांना होम स्टे सुविधा देऊ इच्छिणार्‍यांना प्रशिक्षण
गोव्याचे भविष्य सशक्त करणे
स्थानिक तरुणांना त्यांच्या आस्थापनांमध्ये रोजगार देणार्‍या उद्योजकांना 100 टक्के पीईएफ आणि ईपीएस प्रति कर्मचारी प्रति महिना रु. 5 हजारपर्यंत अनुदान  (Goa Election)

पुढील पाच वर्षांत गोव्याला एक परिपूर्ण पर्यटन स्थळ बनवणे

आंतर्देशीय पर्यटन, वैद्यकीय पर्यटन आणि वारसा आणि आध्यात्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे.
साहसी खेळ, समुद्रकिनारी पर्यटनाभोवती सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे
आशियातील एमआयसीई राजधानी म्हणून गोवा विकसित करणे
सत्तेवर आल्यानंतर सहा महिन्यांत कायदेशीर खाणकाम पुन्हा सुरू करणे
गरिबांना वेळेवर आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सामाजिक कल्याण लाभ प्रदान करणे; डीडीएसवाय अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन तीन हजार रुपये प्रति महिना वाढवणे
गोव्यातून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारताला तयार करण्यासाठी गोव्यासाठी मिशन गोल्ड कोस्टचा शुभारंभ करणे
गोव्याचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल व्यवस्थापनात रूपांतर करणे.
गोवा अन्नदाताचे उत्पन्न वाढवणे
गोव्याची 50 अब्ज अर्थव्यवस्था बनवणे
मत्स्य व्यवसाय उद्योगाला सहाय्य करणे
स्वावलंबी महिला निर्माण करणे
राज्यातील महिलांचे सक्षमीकरण
हरित गोव्यासाठी स्वच्छ वाहतूक उपलब्ध करणे (Goa Election)

हेही वाचलतं का? 

Back to top button