तृणमूलने काँग्रेसला पाठिंबा द्यावा - रणदिप सुरजेवाला | पुढारी

तृणमूलने काँग्रेसला पाठिंबा द्यावा - रणदिप सुरजेवाला

पणजी ःपुढारी वृत्तसेवा गोव्यात भाजपला पराभूत करण्यासाठी तृणमूल काँग्रसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे युतीसाठी मागील महिन्यात प्रस्ताव दिला होता. परंतु तो प्रस्ताव काँग्रेस नेत्यांनी धुडकावला होता. अखेर आता काँग्रेसच तृणमूल काँग्रेसला आमच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यास सांगत आहे. यावरून पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसला युतीवरून काँग्रेसने डिवचल्याने आणखी एका वादाला तोंड फोडल्याचे दिसते. तृणमूल काँग्रेसचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार असल्याने त्यांनी अजूनही वेळ गेली नसून काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंवा द्यावा, असे आवाहन रणदीप सुरजेवाला यांनी केले. त्याशिवाय ममता बनर्जी यांच्याशी काँग्रेसचे चांगले संबंध राहिले असल्याचेही सुरजेवाला यांचे म्हणणे आहे. (तृणमूलने काँग्रेस)

त्याशिवाय या युतीवरून काँग्रेस आणि तृणमूल नेत्यांच्या ट्विटर युद्धही मध्यंतरी रंगले होते. काँग्रेस भवनात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांच्यासमवेत काँग्रेस नेते आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा निवडणुकीसाठी एआयसीसी मीडिया प्रभारी अलका लांबा, सुनील कवठणकर आदी उपस्थित होते. गेल्या महिन्यापर्यंत (जानेवारी 2022) देशातील बेरोजगारीचा दर 7.9टक्के वर पोहोचला आहे. गोवा हा बेरोजगारीत दुसर्‍या स्थानावर असून, एक लाखाहून अधिक युवकांनी रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी केली आहे, असे असतानाही त्यांना नोकरी मिळत नाही. (तृणमूलने काँग्रेस)

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने पाच वर्षांत म्हणजे 2027-28 पर्यंत 60 लाख नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले आहे, हाही एक विनोद असून, डॉ. प्रमोद सावंतही अशीच खोटी आश्वासने देत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाणावली समुद्र किनार्‍या जवळ दोन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर जे विधान केले होते, त्यावरून गोव्यातील भाजपची महिला विरोधी मानसिकता असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली. (तृणमूलने काँग्रेस)

हेही वाचलतं का?

Back to top button