मोदी यांच्या भाषणाची गोमंतकीयांना उत्सुकता | पुढारी

मोदी यांच्या भाषणाची गोमंतकीयांना उत्सुकता

पणजी : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी (6 फेब्रुवारी) दुपारी 4.00 वा. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उत्तर गोव्यात एकाच वेळी 20 ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. वीस ठिकाणी खास मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणांची यादीही भाजपने जाहीर केली आहे. गोमंतकीयांना मोदी यांच्या भाषणाची उत्सुकता आहे. या स्थळावर जे भाजपचे नेते उपस्थित राहतील, त्यांचीही यादी जाहीर केली आहे. ही माहिती प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आहे.

स्थळ आणि भाजप नेते

मांद्रे – जिल्हा पंचायत हॉल – सुनील राणे.
पेडणे येथे येथील भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांच्या वडिलांचे निधन झालेले असल्यामुळे तेथे कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही.
डिचोली – दीनदयाळ सभागृह – राहुल नार्वेकर.
थिवी – ग्रीन यार्ड हॉल, थिवी – श्रीपाद नाईक.
म्हापसा – भाजप उत्तर गोवा कार्यालय – राम सातपुते.
शिवोली – जनार्दन मनेरकर यांचे घर – राम शिंदे.
साळगाव- पंचायत हॉल गिरी – राजू कुडची.
कळंगुट -भाजप कार्यालय- समाधान अवधाते.
पर्वरी – स्नेह बटिक हॉल पर्वरी – लक्ष्मण सौदी.

हळदोणा – सावियो मार्टीन यांच्या घरी – दामू नाईक

पणजी – भाजप निवडणूक कार्यालय सरस्वती मंदिर पणजी – सुभाष शिरोडकर
ताळगाव – आमदार बाबूश मोन्सेरात यांचे निवासस्थान – नीलेश काब्राल.
सांताकू्रज – मेरशी पंचायती जवळ- माविन गुदिन्हो.
सांत आंद्रे – लवंदे सभागृह आगशी – नरेंद्र सावईकर.
कुंभारजुवे – आमदार पांडुरंग मडकईकर यांचे निवासस्थान – योगेश सागरे.
मये – चोडण पंचायत हॉल- संजय पाटील.
साखळी – रवींद्र भवन साखळी – या ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे व प्रभारी सी. टी. रवी हे उपस्थित राहणार असून, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानंतर थेट चर्चाही होणार आहे.
पर्ये – सुंदरम हॉल होंडा – अभय पाटील.
वाळपई – आमदार विश्वजित राणे यांचे कार्यालय वाळपई – किशन रेड्डी.
प्रियोळ – बिग बी हॉल बेतकी – देवेंद्र फडणवीस. (नरेंद्र मोदी)

हेही वाचलत का?

 

Back to top button