उत्पल पर्रीकर यांना शिवसेनेचे पाठबळ | पुढारी

उत्पल पर्रीकर यांना शिवसेनेचे पाठबळ

पणजी : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेचे उपराज्यप्रमुख शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी मागे घेतला. ते पणजीतून निवडणूक लढवणार होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आपला उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. राऊत यांनी ट्वीट करत शैलेंद्र वेलिंगकरांची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केलेे. इतकेच नाही तर शिवसेनेने उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.

‘आम्ही आमचा शब्द पाळत आहोत. शैलेंद्र वेलिंगकर यांनी पणजीमधून उमेदवारी मागे घेतली आहे. इतकेच नाही तर आमचे कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांना पूर्ण पाठिंबा देतील. पणजीची लढाई हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही आहे, असे आमचे मत आहे,’ असे राऊत म्हणाले. उत्पल निर्णयावर ठाम राहिले, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल अशी घोषणा राऊतांनी केली होती. मात्र शिवसेनेच्या पहिल्या यादीत वेलिंगकर यांना पणजीतून उमेदवारी दिली होती.

Back to top button