priyanka chopra : आई बनल्याने ‘जी ले जरा’मधून आऊट - पुढारी

priyanka chopra : आई बनल्याने ‘जी ले जरा’मधून आऊट

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच आई झाली आहे. प्रियांका आणि निक दोघांनी सोशल मीडियातून काही दिवसांपूर्वी ही माहिती सर्वांसोबत शेअर केली होती. सरोगसीद्वारे प्रियांका-निक पालक बनले आहेत. तथापि, प्रियांका आई बनल्याने फरहान अख्तर दिग्दर्शन करत असलेल्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे निर्माते चिंतेत पडले आहेत. एका माहितीनुसार प्रियांका आता यापुढील काळात तिचा बराचसा वेळ मुलीच्या संगोपनासाठी देईल. त्यामुळे या चित्रपटातून प्रियांका बाहेर पडू शकते. निर्मात्यांनी इतर अभिनेत्रींचा शोध घ्यायलाही सुरुवात केली आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ, आलिया भट्ट यांच्या भूमिका आहेत.

दरम्यान, प्रियांका आणि निकने त्यांच्या मुलीच्या स्वागतासाठी लॉस एंजलिसमधील घराला बेबी फ्रेंडली बनविण्यासाठी रिनोव्हेशन केले असून या 150 कोटींच्या घरात प्रियांका-निक आणि त्यांची कन्या राहणार आहे. प्रियांकाच्या मुलीचा जन्म कॅलिफोर्नियातील रुग्णालयात डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या तब्बल 12 आठवडे आधी झाला आहे. प्री मॅच्युअर डिलिव्हरीमुळे सध्या मुलीची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे प्रियांका आणि निकने मुलीला काही काळ रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button