Goa News : गोव्यात १० हजार कोटींचे नवे प्रकल्प : नितीन गडकरी

Goa News : गोव्यात १० हजार कोटींचे नवे प्रकल्प : नितीन गडकरी
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यासाठी १० हजार कोटींच्या नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. झुआरी नदीवर बांधलेल्या २५३० कोटी खर्चाच्या नव्या पुलाचे गडकरी यांचे हस्ते आज (दि.२३) उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  Goa News

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग, श्रीपाद नाईक व गोव्याचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. राज्याला अपघात मुक्त करण्यासाठी १०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एकही अपघात होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. Goa News

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे लांब झुआरी पूल असून या पुलाजवळ २८० कोटी खर्चून दोन टॉवर बांधण्यात येणार आहेत. या कामाची पायाभरणी गडकरी यांनी केली. पर्वरी येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ६५० कोटी खर्च करुन ७ कि.मी. लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. २०१४ पासून रस्ता मंत्रालयाने गोव्यात २५ हजार कोटींची कामे केली आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news