गोवा : आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या ताफ्यातील वाहनाला बसची धडक

गोवा : आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या ताफ्यातील वाहनाला बसची धडक
Published on
Updated on

पणजी, पुढारी वृत्तसेवा : गोवा सरकारमधील मंत्री विश्वजित राणे यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाला बसने धडक दिल्याने आज (दि.१८) अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मंत्री राणे दुसऱ्या वाहनातून इच्छितस्थळी निघून गेले.

मंत्री राणे पणजीतून आपली पत्नी आमदार डॉ. देविया राणे यांना सोबत घेऊन वाळपई येथे आपल्या मतदारसंघात जात होते. बाणस्तारी येथे पुलावर राणे यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाला बसने धडक दिली. या अपघातात मोठे नुकसान झाले नाही. राणे काही वेळात दुसऱ्या सुरक्षा वाहनातून वाळपईला गेले.

विश्वजित राणे हे गोवा सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. राणे यांच्याकडे नगर नियोजन, शहरी विकास, आरोग्य, महिला व बाल कल्याण व वन ही पाच महत्त्वाची खाती आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news