GMail: Google Will remove Gmail account
GMail: Google Will remove Gmail account

Gmail Account | सावधान…! Google निष्क्रिय Gmail अकाऊंट हटवणार! कंपनीने यूजर्संना मेल पाठवत दिला इशारा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Google ने निष्क्रीय Gmail यूजर्संना त्यांच्या खात्याच्या "निष्क्रियतेबद्दल" ईमेल पाठवण्यास सुरूवात केली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ बंद किंवा निष्कर्ष असणारी Gmail अकाऊंट हटवणार असल्याचा कंपनीने इशारा दिला आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले (Gmail Account) आहे.

कंपनीने यापूर्वीच जीमेल किंवा यूट्यूब खाती दोन वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय असतील, तर ती हटवणार असल्याचे म्हटले होते. Google ने जाहीर केल्याच्या जवळपास दोन महिन्यांनंतर यासंदर्भातील हालचाली सुरू केल्या आहेत. गॅजेट्स नाऊच्या मते, यूजर्संना त्यांचे जीमेल अकाऊंट हटवण्यापासून रोखण्यासाठी लॉगइन करण्याची आठवण करून दिली जात आहे. एका ईमेल नोट्सचा हवाला देत, "हा बदल आजपासून सुरू झाला आहे, हे स्पष्ट केले आहे. तसेच निष्क्रिय असलेल्या कोणत्याही Google खात्यावर तो १ डिसेंबरपासून प्रत्यक्षात लागू होईल असा इशाराही गॅजेट्स नाऊने दिलेल्या वृत्तातून (Gmail Account) दिला आहे.

अनेक युजर्सचे GMail अकाउंट आहेत. काही युजर्स आपले जीमेल खाते सुरू करतात, परंतु त्याकडे वर्षोंवर्षे एकदाही ढुंकून पाहत नाहीत. त्यामुळे ज्या युजर्सनी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जीमेल अकाउंट (Gmail Account) वापरले नसल्यास त्यांच्यावर गुगलकडून कारवाई करण्यात येणार आहे. दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळापसून बंद असलेली आणि वापरात नसलेली Gmail अकाउंटस् गुगलच्या Gmail सिस्टीममधून काढून टाकली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. Google कडून सध्या नवीन धोरणांचा अवलंब केला जात आहे. कंपनीने जाहीर केलेल्या धोरणानुसार, १ डिसेंबर, २०२३ पासून कंपनीकडून प्रत्यक्षात पावले उचलली जाणार आहेत, त्यापूर्वी काही अकाऊंट्स धारकांना याबाबत इशारा (Gmail Account) दिला जात आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news