Gmail Blue Tick : Gmail वर ही येणार आता ब्लू टिक; जाणून घ्या कोणासाठी असेल ही सेवा | पुढारी

Gmail Blue Tick : Gmail वर ही येणार आता ब्लू टिक; जाणून घ्या कोणासाठी असेल ही सेवा

पुढारी ऑनलाइन डेस्क : ट्विटर आणि इन्स्टाग्रामने खाते सत्यापित करण्यासाठी ब्लू टिक सेवा आणली होती. नुकत्याच काही काळापूर्वी लिंक्डइनने देखील ब्लू टिक वेरिफिकेशन सुरू केले आहे. याशिवाय यु ट्यूब प्रिंटरेस्ट, टिकटॉक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील खाते सत्यापनासाठी ब्लू टिक सुरू केले होते. या रांगेत आता गुगलचे Gmail देखील येत आहे. आता गुगलने आपल्या Gmail साठी देखील ब्लू टिकची सेवा सुरू केली आहे. जाणून घ्या कोणाकोणाला मिळणार Gmail Blue Tick…

Gmail Blue Tick : जी मेल ब्लू टिक कोणाला मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, गुगल आपल्या जी मेल सर्विसमध्ये काही मोजक्या वापरकर्त्यांच्या नावासमोर निळा चेकमार्क देण्यास सुरुवात केली आहे. टेक क्रंचने दिलेल्या अहवालानुसार, गुगलने बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. गुगल आपल्या काही मोजक्या वापरकर्त्यांना त्यांच्या नावासमोर निळा चेकमार्क देणार आहे. ही सेवा फक्त त्या ग्राहकांसाठी देण्यात येणार आहे ज्यांनी जीमेलचे ब्रांड इंडिकेटर फॉर मेसेज आइडेंटिफिकेशन (BIMI) हे फिचर घेतले आहे, त्यांच्या नावापुढे हे ब्लू टिक देण्यात येणार आहे.

Gmail Blue Tick : काय आहे BIMI फीचर?

गुगलने जीमेलसाठी 2021 मध्ये BIMI हे फीचर लाँच केले होते. हे फिचर विशेष करून कंपन्यांना ब्रँडिंगसाठी वापरता येते. कंपन्यांना त्यांच्या ईमेलमध्ये ब्रँड या फिचरमध्ये ईमेलमध्ये ब्रँड लोगो अवतार म्हणून दर्शविण्यासाठी मेल पाठविणाऱ्या कंपनीला त्यांचे खात्याचे मजबूत त्यापन वापरणे आणि ब्रँड लोगोची पडताळणी करणे आवश्यक आहे. आता जर तुम्हाला ब्रँडच्या नावापुढे निळा चेकमार्क दिसला तर याचा अर्थ ब्रँडने BIMI वैशिष्ट्य स्वीकारले आहे. गुगलचे म्हणणे आहे की हे अपडेट वापरकर्त्यांना वैध सेंडर्स ओळखण्यास मदत करेल. यामुळे, तुम्ही कंपनीनेच पाठवल्या जाणाऱ्या निळ्या चेकमार्कसह मेलवर विश्वास ठेवू शकता.

उदाहणार्थ तुम्हाला एखाद्या कंपनीकडून जॉब ऑफरचा मेल आला असेल, तर तो त्याच कंपनीने पाठवला आहे का, हा मेल फिशिंग आहे किंवा फेक मेल आहे हे ओळखण्यासाठी या ब्लू चेकमार्कची मदत होणार आहे. संबंधित कंपनीने जर BIMI हे फिचर घेतले असेल तर त्या कंपनीच्या अधिकृत मेल आयडीवरून पाठविलेल्या मेलवर ब्लू टिक दिसेल.

हे ही वाचा :

Twitter : ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन पुन्हा सुरू होणार? एलॉन मस्क म्‍हणाले….

Twitter removed blue tick : ट्विटरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे ब्लू टिक हटवले…

Back to top button