

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील वलखेड गावात गणेश मंडळाच्या माध्यमातून गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम गावातील शाळेच्या मैदानात भरविल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शिक्षण मंत्र्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान सदर कार्यक्रम रितसर परवानगी घेऊन शाळेच्या नव्हे, तर ग्रामपंचायतीच्या खुल्या मैदानात घेतल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
गणेशोत्सवानिमित्त वलखेड येथे गौतमी पाटील (Gautami Patil) हीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. मात्र, सदर कार्यक्रम हा शाळेच्या मैदानात झाल्याची चर्चा झाल्याने याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण विभागाला चाैकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या एकता कला, क्रिडा बहुउद्देशीय संस्थेने शाळेच्या मैदानावर कार्यक्रम घेतलेला नसून ग्रामपंचातीच्या मैदानात रितसर भाडेपट्टा भरून परवानगी घेऊन कार्यक्रम घेतल्याचे तसेच संस्था अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रम घेत असून या कार्यक्रमाला देखील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. कुठल्याही प्रकारची हुलडबाजी न होता. शांततेत कार्यक्रम झाल्याचा दावा आयोजक संस्थेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केला आहे.
हेही वाचा :