गौतम अदानी ‘फोर्ब्स’च्या श्रीमंतांच्या यादीत पुन्हा पहिल्‍या २० मध्‍ये

गौतम अदानी ( संग्रहित छायाचित्र)
गौतम अदानी ( संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्‍या यादीत   पहिल्‍या २० मध्‍ये उद्योगपती गौतम अदानी यांना पुन्‍हा एकदा स्‍थान मिळाले आहे. ( Forbes Richest List ) मंगळवार, ७ फेब्रुवारी रोजी अदानी हे जगातील श्रीमंत व्‍यक्‍तींच्‍या यादीत १७ व्‍या स्‍थानी आले. मागील आठवड्यात, अदानी फोर्ब्सच्या यादीत तिसऱ्या स्थानावरून घसरले होते. ते पहिल्‍या २० मधूनही ते बाहेर पडले होते.

 Forbes Richest List : अदानी समूहाच्‍या शेअर्समध्‍ये सकारात्‍मक वाढ

मागील पाच दिवसांपासून अदानी समूहाच्‍या शेअर्समध्‍ये सकारात्‍मक वाढ झाली आहे. अदानी पोर्ट शेअरमध्‍ये ९.६४ टक्‍क्‍यांनी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर बुधवारपर्यंत ( दि. ८) २५ टक्क्यांनी वाढले आहेत, तर अदानी विल्मर आणि अदानी ट्रान्समिशनच्या किमती 399.40 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

अमेरिकेतील गुंतवणूक सल्‍लगार कंपनी हिंडेनबर्गने अदानी समूह समूहाचा कथित कॉर्पोरेट गैरव्यवहाराचा हवाला देणारा अहवाल प्रसिद्ध केला होता.त्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स २४ जानेवारीपासून प्रचंड घसरण झाली. जानेवारीच्या अखेरीपासून, अदानी समूहाच्या शेअर्सचे बाजार मूल्य USD ११८ अब्ज पेक्षा जास्त कमी झाले होते. मागील काही दिवस समभागात सकारात्‍मक वाढ झाल्‍याने अदानी समूहाला दिलासा मिळला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news