Mumbai Ganesh Visarjan 2026 : लाडक्या बाप्पाला आज निरोप!

विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष; पोलीस, महापालिका आणि वाहतूक यंत्रणा सज्ज
Mumbai Ganesh Visarjan 2026
Mumbai Ganesh Visarjan 2026pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई :ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात मुंबईचा लाडका गणराया आज, अनंत चतुर्दशीला भक्तांचा निरोप घेणार आहे. शहरातील सुमारे ९ हजारहून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन होणार असून, त्यापैकी लालबागच्या राजासह १३२ लोकप्रिय मंडळांच्या मिरवणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस, महापालिका, वाहतूक, अग्निशमन दल आणि आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने तयारी केली आहे.

गर्दीच्या मार्गावर विशेष लक्ष

लालबाग, परळ, चिंचपोकळी, भायखळा, दादर आणि दक्षिण मुंबईतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तीच्या मिरवणुका गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना होतील. या मार्गावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू, वर्सोवा, माहिम, पवई तलाव यांसह विविध विसर्जनस्थळांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Mumbai Ganesh Visarjan 2026
DSE Engineering Admission 2026 : थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीला ५० हजार १५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश

गर्दीच्या ठिकाणी चेंगरचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेषातील पोलिसांची पथकेही तैनात आहेत. महिलांच्या दागिन्यांची चोरी, पॉकीटमारी तसेच हरवणाऱ्या मुलांच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.

समुद्रकिनाऱ्यांवर जीववरक्षक

चौपाट्यांवर जीववरक्षक आणि आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. भाविकांनी खोल समुद्रात जाऊ नये, प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रात्री उशिरापर्यंत मेट्रो धावणार

  • विसर्जनासाठी शहराच्या विविध भागातून आलेल्या भाविकांना परतीचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी मेट्रो सेवा वाढवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आरे ते कफ परेड मेट्रो ३ भुयारी मार्गिका रात्रभर सुरू राहणार आहे. शुक्रवारी सकाळी ५.५५ वाजता सुरू झालेली मेट्रोसेवा शनिवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत सलग ४० तास चालवली जाणार आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली. एरवी इतर दिवशी मेट्रोसेवा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असते.

मध्यरात्रीसुद्धा धावणार लोकल गाड्या!

मुंबई :अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशभक्तांना रात्री उशिरापर्यंत लोकलने प्रवास करता यावा, म्हणून मध्य रेल्वे २२ विशेष लोकल गाड्या तसेच पश्चिम रेल्वे चर्चगेट-विरार दरम्यान १२ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

  • डाऊन मेन मार्गावर लोकल सीएसएमटी - कल्याण (०१:४०), सीएसएमटी - ठाणे (०२:३०) सीएसएमटी - कल्याण (०३:२५) वाजता सुटणार आहेत. अप मेन मार्गावर कल्याण-सीएसएमटी (००:०५), ठाणे - सीएसएमटी (०१:००) आणि ठाणे- सीएसएमटी (०२.००) वाजता सुटेल. डाऊन हार्बर मार्गावर केवळ २५/२६ सप्टेंबर रोजी सीएसएमटी - पनवेल (०१.३०) तसेच सीएसएमटी -पनवेल ०२.४५ वाजता सुटेल. अप हार्बर मार्गावर पनवेल- सीएसएमटी (०१.००) आणि पनवेल- सीएसएमटी (०१.४५) वाजता लोकल सुटेल. चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष लोकल.

चर्चगेटहून विरारच्या दिशेने धावणाऱ्या डाऊन मार्गावरील विशेष लोकल रात्री १.१५ ते पहाटे ३.४५ या वेळेत चालवल्या जाणार आहेत. तसेच विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या अप मार्गावरील विशेष लोकल रात्री १२.१५ ते पहाटे ३ या कालावधीत सुरू राहणार आहेत.

Mumbai Ganesh Visarjan 2026
Sahil Wakode Death Case : साहिलच्या पालकांचे आझाद मैदानात उपोषण

सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत धावणाऱ्या ३७ जलद अप लोकलना मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. मात्र, १५ डब्यांच्या लोकल ग्रंट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच अप मार्गावर सायंकाळी ५ ते रात्री ११.३० या वेळेत चर्नी रोडच्या फलाट क्रमांक २ वर थांबा दिला जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news