पुणे : पुढारी वृत्तसेवा : आयुष्याच्या संध्याकाळी आईला आर्थिक मदत करण्याचे सोडून तिची बनावट सही करून सदनिका परस्पर विक्री करत फसवणूक केल्याप्रकरणी मुलावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही 68 वर्षांची असून ती आपली मुलगी, जावयाबरोबर तसेच लहान मुलाबरोबर मोहम्मदवाडी येथे राहते. तक्रारदार यांचे पती सरकारी नोकरदार होते. त्यांचे 2006 मध्ये निधन झाले.