पुणे : पाच कोटींचे कर्ज देतो सांगत 68 लाखांची फसवणूक

पुणे : पाच कोटींचे कर्ज देतो सांगत 68 लाखांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एका व्यावसायिकाला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन करून विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगून विमा पॉलिसी काढल्यावर त्यावर पाच कोटी रुपये कर्ज शून्य टक्क्याने देतो, असे सांगत विश्वास संपादन करत तब्बल 68 लाख 35 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अमित प्रकाश जोशी (वय 49) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, कमलेश तुकाराम घुलघुले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2021 ते आजरोजीपर्यंत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जोशी यांना आरोपी कमलेश घुलघुले याने स्टारयुरेका इन्शुरन्स मार्केटिंग प्रा. लि. कंपनीतून वेळोवेळी वेगवेगळया मोबाईल क्रमांकांवरून फोन करून इन्शुरन्स पॉलिसी काढल्यास त्यावर पाच कोटी रुपये शून्य टक्क्याने देतो असे सांगितले.

त्याप्रमाणे त्यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या 1.64 कोटी रुपयांच्या पॉलिसी काढण्यास भाग पाडून तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज न दिल्याने त्यांनी स्टारयुरेका इन्शुरन्स मार्केटिंग प्रा. लि. कंपनीचे सदर संचालक यांना विचारणा केली. त्यांनी सदरच्या पॉलिसी रद्द करून सर्व प्रीमियम परत देण्याचे आश्वासन देऊन अद्यापपर्यंत तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारचे पैसे परत दिले नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करून न देता एकूण 68 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news