

प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार हा कोबाड गांधी (Fractured Freedom) यांनी लिहलेल्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन' या पुस्तकाला देण्यात आला होता. हे पुस्तक अनघा लेले यांनी अनुवादीत केले आहे. त्यानंतर तो पुरस्कार रद्द करण्यात आला तसेच जी निवड समिती होती. तीही रद्द करण्यात आली आहे. नक्षलवादाचं उदात्तीकरण राज्यात होऊ शकत नाही, असा आक्षेप घेत पुरस्कार तज्ज्ञ समितीची चौकशी करण्याचा आदेश केसरकर यांनी दिला आहे.
कोबाद गांधी हे मुंबईचे आहेत. ७० च्या दशकातील समाजातील वंचित आणि शोषित लोकांसाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ते भाकप (माओवादी) या पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य बनले. २००९ मध्ये कोबाड गांधी यांना नक्षली कारवायात सक्रीय असल्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. तुरुंगातील दिवसांवर त्यांनी एक पुस्तक लिहले. ते म्हणजे, 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन'.
हेही वाचा :