FPI invest | ‘भाजप’च्या विजयाचा भारतीय बाजारात इफेक्ट! FPIs ची ६ दिवसांत २६,५०५ कोटींची गुंतवणूक

FPI invest | ‘भाजप’च्या विजयाचा भारतीय बाजारात इफेक्ट! FPIs ची ६ दिवसांत २६,५०५ कोटींची गुंतवणूक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजपने सत्ता मिळवल्यानंतर देशात राजकीय स्थैर्य राहणार असल्याचे संकेत आणि देशातील मजबूत आर्थिक वाढीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा ओतण्यास सुरुवात केली आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) या महिन्याच्या पहिल्या सहा ट्रेडिंग सत्रांत भारतीय शेअर बाजारांमध्ये २६,५०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

संबंधित बातम्या

 ऑक्टोबरमध्ये ९ हजार कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली होती. याआधी परदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारातून ३९,३०० कोटी रुपये काढून घेतले होते, असे डिपॉझिटरीजमधील आकडेवारीवरून दिसून आले आहे. याबाबतचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ पुढे चालू राहण्याची शक्यता आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार यांनी म्हटले आहे.

"२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर राजकीय स्थैर्य राहणार असल्याचे संकेत, भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाढीचा वेग, कमी झालेली महागाई, यूएस बॉण्डच्या यिल्ड्समध्ये सातत्याने होणारी घट आणि ब्रेंट क्रूडमधील सुधारणा यामुळे परिस्थिती भारताच्या बाजूने अनुकूल झाली आहे," असे विजयकुमार म्हणाले.

आकडेवारीनुसार, या महिन्यात ८ डिसेंबरपर्यंत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटीजमध्ये २६,५०५ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे.

राजकीय स्थैर्याचे संकेत देणार्‍या महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर एफपीआयचा ओघ वाढला असल्याचे फिडेलफोलिओ इन्व्हेस्टमेंट्सचे संस्थापक किसलय उपाध्याय यांनी म्हटले आहे.

यूएस फेडकडून व्याजदरात कपातीची शक्यता

जागतिक स्तरावर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. यामुळे यापुढे उच्च व्याजदर राहणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. या बदलामुळे अमेरिकन डॉलर इतर चलनांच्या तुलनेत कमकुवत झाला, असे मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सहयोगी संचालक – व्यवस्थापक संशोधन हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले.

तसेच यूएस ट्रेझरी बाँड यिल्ड्समध्ये घट झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना जोखीम परताव्याच्या प्रोफाइलमध्ये सुधारणा लक्षात घेता भारतीय इक्विटी मार्केटमधील गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करण्यास प्रवृत्त केले आहे, असेही ते पुढे म्हणाले.

विकेते बनले खरेदीदार

क्षेत्रीय पातळीवर नजर टाकल्यास, जिथे FPI आघाडीच्या बँकांच्या शेअर्सबाबत विक्रेते होते ते आता तिथे खरेदीदार म्हणून पुढे आले आहेत. आयटी, टेलिकॉम, ऑटोमोबाईल्स आणि कॅपिटल गुड्स यासारख्या सेगमेंटमधील लार्ज कॅपमध्येही जोरदार खरेदी होत आहे.

बॉण्डच्या संदर्भात विचार केल्यास कर्ज बाजाराने आढावा कालावधीत ५,५०६ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. नोव्हेंबरमध्ये १४,८६० कोटी आणि ऑक्टोबरमध्ये ६,३८१ कोटींच्या गुंतवणुकीचा सहा वर्षांचा उच्चांक गाठला होता, असे आकडेवारीवरून दिसून येते.

या वर्षी आतापर्यंत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) ने इक्विटी मार्केटमध्ये १.३१ लाख कोटी रुपये आणि कर्ज बाजारामध्ये (debt markets) ५५,८६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news