Digital Marketing : ब्रँड अवरनेस म्हणजे काय, ग्राहक समाधान कसे मोजले जाते? | Brand Awareness | Customer Satisfaction

Digital Marketing : ब्रँड अवरनेस म्हणजे काय, ग्राहक समाधान कसे मोजले जाते? | Brand Awareness | Customer Satisfaction
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या डिजिटल युगात डिजिटल मार्केटिंगला अनन्य साधारण महत्त्व आलेले आहे. प्रत्येक ब्रँड, कंपनीच नाही तर लहान व्यावसायिकही डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आपल्या उत्पादन आणि सेवांचा पसारा वाढवत आहेत. पण काहींना डिजिटल मार्केटिंग ही संकल्पान किचकट वाटते, म्हणून आजच्या लेखातून आपण डिजिटल मार्केटिंगमधील काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत. (Brand Awareness Digital Marketing)

ब्रँड अवरनेस (Brand Awareness)

Awareness Marketing टीव्ही, डिजिटल, प्रिंट, होर्डिंग अशा बऱ्याच माध्यमातून केले जाते. जनजागृती आणि ब्रँडिंग या गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. ग्राहकांच्या मनात कंपनीची वस्तू, सेवा किंवा पूर्ण कंपनीच याबद्दलची असलेली प्रतिमा म्हणजे ब्रँड होय. ही प्रतिमा मार्केटिंगसाठी झालेले प्रयत्न, प्रत्यक्षात वस्तू किंवा उत्पादनाचे स्वरूप तसेच इतरांनी केलेल्या सूचना यावर अवलंबून असते. उत्पादन किंवा सेवा पहिल्यांदा वापरण्यासाठी उद्युक्त करणारी बाब म्हणजे ब्रँडिंग होय. ब्रँडिंगच्या आधारवर कंपन्या त्यांच्या उत्पादन किंवा सेवांची किंमत स्पर्धकांपेक्षा जास्त आकारू शकतात. ब्रँड अवेरनेस कसा आहे, हे समजून घेण्यासाठी कंपन्या सर्व्हेचा आधार घेतात. अशा सर्व्हेंच्या बरोबरीनेच कंपनीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहाणाऱ्या ग्राहकांची संख्या, वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या हेही ब्रँड अवेरनेसमध्ये विचारात घेतले जाते. (Brand Awareness Digital Marketing)

A. Awareness Metric | Brand Awareness | Digital Marketing

खरेदीची एक सायकल असते. या काळात जर ग्राहकाला एखादी वस्तू किंवा सेवा घेताना सर्वप्रथम आपला ब्रँड आठवत असेल तर त्याला Top Of Mind Recall असे म्हटले जाते.

B. Evaluation Marketing

या प्रकारच्या मार्केटिंगमध्ये ग्राहकाला स्पर्धक ब्रँडशी आपल्या ब्रँडसोबत तुलना करण्याची संधी दिली जाते. बऱ्याच कार कंपन्याचे ब्रॉशर अशा प्रकारचे असतात. यासाठी Text Drive हे मेट्रिक बऱ्याच वेळा वापरले जाते. समजा १०० लोकांनी कारची टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि त्यातील १० लोकांनी प्रत्यक्षात कार खरेदी केली तर यावरून किती लोक कार घेतात याची शक्यता वर्तवता येते. टेस्ट ड्राईव्ह वाढण्यासाठी शोरूमध्ये प्रत्यक्षात भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या (FootFall)वाढवण्याचाही प्रयत्न केला जातो. थोडक्यात एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यापूर्वी ग्राहकाने घेतलेली चाचणी म्हणजे Test Drive होय.

C. Loyalty Marketing

एखाद्या ब्रँडची सेवा, उत्पादने जर ग्राहक वारंवार घेत असतील तर ते ग्राहक त्या ब्रँडशी प्रामाणिक असतात. Loyalty Marketingचे महत्त्वाचे निदर्शक Churn Rate आहे. एका वर्षांत किती ग्राहकांनी आपले उत्पादन किंवा सेवा वापरायची बंद केली याची टक्केवारी म्हणजे Churn Rate होय.

D. ग्राहक समाधान (Customer Satisfaction)

ग्राहक आपल्या उत्पादन किंवा सेवांबद्दल समाधानी असतील, तर भविष्यातील विक्रीसाठी त्याचा फायदा होतो. यासाठी Customer Satisfaction हे मेट्रिक महत्त्वाचे ठरते. आमचे उत्पादन किंवा सेवा तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार यांना सुचवाल का, असे सर्व्हे तुम्ही भरले असतील. यात तुम्हाला १ ते १० या स्केलमध्ये उत्तर द्यायचे असते. याला नेट प्रमोटर स्कोर (Net Promoter Score) असे नाव आहे. हा प्रश्न विचारण्याचा हेतू ग्राहक किती समाधानी आहेत, ते शोधणे हेच असते.

(पुढील लेखात मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंगसंदर्भात इतर काही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू.)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news