आता निमित्त नको, गुंतवणूक करा : लवकरच फक्त २५० रुपयांची SIP करता येणार

Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुंतवणूक करण्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा फार चांगला मार्ग मानला जातो. SIPच्या माध्यमातून म्युचअल फंडात गुंतवणूक होत असल्याने फार चांगला परतावा मिळतो. सध्या महिन्याला ५०० रुपये गुंतवणूक SIP सुरू करता येते. पण येत्या काही महिन्यात फक्त २५० रुपयांनी SIP सुरू करता येणे शक्य होणार आहे. (SIP)

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि म्युचअल फंडमधील कंपन्या मिळून अशा प्रकारे अत्यल्प रकमेची SIP प्रत्यक्षात कशी साकारता येईल, यावर प्रयत्न करत आहेत. SEBIच्या चेअरपर्सन मधाबी पुरी बुच यांनी ही माहिती दिली आहे.

बिझनेस टुडे या मासिकाच्या वतीने आयोजित परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अधिकाधिक लोकांना गुंतवणूक करता यावी आणि त्यातून आर्थिक समावेशीकरण साधता यावे यासाठी ही पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. "आम्ही सध्या यावर काम करत आहोत. यातील आर्थिक समावेशीकरणही साधले जाईल आणि मार्केटलाही मोठी ताकद मिळेल."

SIP कसे काम करते?

नियमित गुंतवणुकीच्या तत्त्वावर SIP चालते. रिकरिंग डिपॉजिटसारखे दर महिन्याला आपण पैसे जमा करत जातो. ही रक्कम म्युचअल फंडात गुंतवली जाते. एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा दरमहा थोडी थोडी गुंतवणूक करणे सर्वसामान्यांच्या अवाक्यात असते.
सध्या काही म्युचअल फंड कंपन्या महिन्याला १०० रुपयांची SIP देऊ करतात, पण हे पर्याय फारच कमी आहेत.

स्थानिक गुंतवणुकीचा देशाला फार मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. "इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्थापेक्षा भारत जास्त सक्षम बनला आहे. याचे कारण रिटेल गुंतवणूक हे आहे. शेअर बाजारातील होणारी थेट गुंतवणूक असेल किंवा म्युचअल फंडांच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक असो, याचा भारताला मोठा फायदा झाला आहे. यामुळेच परकीय गुंतवणूकदारही आकर्षित होत आहेत."

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news