Suryakumar Yadav : सूर्यकुमारला पाहून विव्ह रिचर्डसनची आठवण येते : टॉम मूडी

Suryakumar Yadav : सूर्यकुमारला पाहून विव्ह रिचर्डसनची आठवण येते : टॉम मूडी
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव गेल्या वर्षभरात टी-20 क्रिकेटमध्ये सातत्याने शानदार कामगिरी करत आहे. सूर्याकडे संपूर्ण मैदानाच्या सर्व दिशांना शॉट लगावण्याची क्षमता आहे, ज्यामुळे त्याला टी-20 क्रिकेटचा नवीन मिस्टर 360 म्हणून ओळखले जात आहे. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मूडी यांनी सूर्यकुमार यादवची तुलना वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू विव्ह रिचर्डसनशी केली. (Suryakumar Yadav)

स्पोर्टस् तकला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा टॉम मूडीला टी-20 क्रिकेटमधील त्याच्या आवडत्या फलंदाजाचे नाव विचारण्यात आले, तेव्हा त्याने सूर्यकुमार यादवचे नाव सांगितले. टॉम मूडी म्हणाला, 'सूर्यकुमार यादव, तो ज्या पद्धतीने खेळतो, ते मनमोहक आहे. हे मला खूप आठवण करून देते. मी तरुण क्रिकेटपटू असताना व्हिव्हियन रिचर्डसन आवडायचे. असा खेळाडू जो खेळावर एकटाच नियंत्रण ठेवतो. (Suryakumar Yadav)

टी-20 मधील त्याचा फॉर्म पाहून बीसीसीआयनेही त्याची जबाबदारी वाढवली आहे. त्याला अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. तसेच न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेसाठी त्याला ही जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत सूर्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने मालिका 2-1 अशी जिंकली.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news