Cricketer Sarfaraz Khan : संघात निवड न झाल्याने सर्फराज नाराज

Cricketer Sarfaraz Khan : संघात निवड न झाल्याने सर्फराज नाराज
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : देशांतर्गत स्पर्धेत धावांचा पाऊस पाडूनही राष्ट्रीय संघात स्थान मिळत नसल्याने रणजीपटू देशी ब्रॅडमन अर्थात सर्फराज खान नाराज झाला आहे. डॉन बॅ्रडमननंतर दुसर्‍या क्रमांकाची सरासरी असूनही त्याला डावलले जात असल्याचे त्याने इनस्टाग्राम स्टोरीतून दाखवून दिले आहे. त्याची ही स्टोरी सध्या चर्चेत आहे. (Cricketer Sarfaraz Khan)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी रात्री उशिरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. या संघात काही नवे चेहरे आहेत. सूर्यकुमार यादवला त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे; तर ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे इशान किशनला संधी देण्यात आली आहे. पण सर्फराज खान सातत्याने धावाही करतो आहे. पण तो अद्यापही संघात स्थान मिळवू शकला नाही. त्याची सरासरी इतकी चांगली आहे की, त्याला भारतीय ब्रॅडमन म्हटले जात आहे. परंतु तरीही त्याला संघात स्थान मिळत नाही. बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीत त्याचे नाव नसल्याचे समजल्यानंतर सर्फराज खानची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे. (Cricketer Sarfaraz Khan)

तीन वर्षांपासून तुफान खेळी (Cricketer Sarfaraz Khan)

सर्फराज गेल्या एक-दोन वर्षांपासून धावा करत नाही. तो सलग तीन वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. 2019-20 रणजी ट्रॉफी हंगामात या फलंदाजाने सहा सामन्यांत 928 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 154.66 होती. त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकली. गेल्या मोसमात तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. 2021-22 हंगामात त्याने सहा सामन्यांत 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. त्यामध्ये चार शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मुंबईने फायनलमध्ये धडक मारली. पण संघाला विजय मिळविता आला नव्हता.

यंदाच्या मोसमातही त्याने दमदार कामगिरी केली आहे. हैदराबादविरुद्ध त्याने नाबाद 126 धावा ठोकल्या. सौराष्ट्रविरुद्ध त्याने 75 धावांची खेळी खेळली. तामिळनाडूविरुद्ध त्याने तुफान फटकेबाजी करत 162 धावा केल्या होत्या.

उत्तम सरासरी

सर्फराज खानचे नाव ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत घेतले जाते. सर्फराजची आतापर्यंतची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी पाहिली तर ती 80.47 आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम प्रथम श्रेणी सरासरीच्या बाबतीत तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. ब्रॅडमन 95.14 च्या सरासरीने पहिल्या क्रमांकावर आहेत. सर्फराजने 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3380 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 12 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

  • सर्फराज खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देशांतर्गत क्रिकेटची आकडेवारी शेअर केली आहे. युवा फलंदाजांनी पहिल्या फोटोत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील किमान 50 सामन्यांमधील सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याचे नाव महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याखाली आहे. ब्रॅडमनची फलंदाजीची सरासरी 95.17 होती, तर सर्फराजने या काळात 80.47 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
  • दुसर्‍या स्टोरीत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटची आकडेवारी शेअर केली आहे. हे आकडे त्याच्या पहिल्या 30 प्रथम श्रेणी सामन्यांचे आहेत. सर्फराजने या काळात 110.73 च्या सरासरीने 2436 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने त्रिशतकाशिवाय 9 शतकी खेळी केल्या आहेत.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news