

पणजी; पुढारी वृत्तसेवा : जागतिक क्रिकेट विश्वात आपल्या चपळ क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स यांनी आज (दि.२) कांपाल पणजी येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चालू असलेल्या क्रीडानगरीला भेट दिली. याप्रसंगी क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी जोंटी रोड्स आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत केले. (Jonty Rhodes)
यावेळी रोड्स म्हणाले भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये फक्त क्रिकेटलाच प्राधान्य देण्यात येते. मात्र, अशा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून इतर खेळांना प्रोत्साहन मिळते. स्थानिक खेळांचा विकास होतो. भारतामध्ये इतर खेळासाठी ही चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. नवोदितांनी त्या सुविधांचा लाभ घेऊन आपले ध्येय साध्य करावे. असे रोड्स म्हणाले.
क्रिकेटवर फोकस केल्यानंतर इतर खेळाकडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण भारतामध्ये विविध खेळांमधील अनेक स्टार खेळाडू आहेत. त्यांना अशा स्पर्धातून संधी उपलब्ध होते. स्पर्धेमध्ये आपले कौशल्य दाखवत विजेतेपद पटकावावे असे त्यांनी सांगितले. आपणाला गोवा आवडत असल्याने आपण गोव्यामध्ये घर घेतल्याचेही त्यांनी सांगितले. (Jonty Rhodes)
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी जागतिक क्रिकेट स्तरावर नावाजलेले क्रिकेट पटू असलेले जॉन्टी रोड्स यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा क्रीडा नगरीला भेट देणे हे आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले.
आपण गोव्यामध्ये घर घेतले असल्यामुळे गोवेकर झालोय. गोव्यामध्ये क्रिकेटचा विकास म्हणावा तेवढा झालेला नाही असे चर्चेतून कळले आहे. जर आपल्याला संधी मिळाली तर गोव्यात क्रिकेट वाढीसाठी आपण आवश्यक ती मदत करायला तयार आहे असे रोड्स म्हणाले. (Jonty Rhodes)
हेही वाचा :