moong kobi bhaji : तेल न वापरता डायटिंग स्पेशल बनवा मूग- कोबी भाजी | पुढारी

moong kobi bhaji : तेल न वापरता डायटिंग स्पेशल बनवा मूग- कोबी भाजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजकाल अनेकाला वजन वाढण्याचा त्रास होत असतो. काहींना कामाच्या गडबडीत योग्य आहार आणि योग्य व्यायाम करता येत नाही. यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. झटपट वजन कमी करण्यासाठी मग डॉक्टारांच्या सल्याने डायटिंग करावे लागते. परंतु, काही जणांना डायटिंगमध्येत आवडीची आणि चविष्ट भाजी खावीशी वाटते आणि वजन कमी होण्याऐवजी पुन्हा जास्तच वाढत जाते. अशावेळी जर तुम्ही वजन न वाढविणारी आणि तेल न वापरता आवडीची भाजी असेल तर आनंदच. चला तर मग यासाठी जाणून घेवूया न तेल वापरता मूग- कोबी भाजी कशी बनवायची…. ( moong kobi bhaji )

साहित्य –

मोड आलले मूग- एक वाटी
कोबी- एक वाटी
बारीक चिरलेला कांदा- एक
टोमॉटो- एक
बारीक चिरलेले कोंथबीर – अर्धा कप
आलं- १ चमचा
लसूण- ६-७ पाकळ्या
जिरे- अर्धा चमचा
जिरे पावडर – अर्धा चमचा
धने पावडर- एक चमचा
कडीपत्ता- ६-७ पाने
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या- २
शेंगदाण्याचा कुट- अर्धा वाटी
हळद- एक चमचा
लाल तिखट- १ ते दिड चमचा

कृती-

१. पहिल्यांदा मोड आलेले मूग आणि कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. कोबीज बारीक चिरून घ्यावे.

२. यानंतर नॉन स्ट्रीक तवा गॅसवर तापत ठेवा. यात अर्धा चमचा जिरे, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून परतवून घ्या.

३. यात नंतर कांदा घालून परतून ध्या आणि त्यात मोड आलेले मूग आणि बारीक चिरलेला कोबी घालून हलवा.

४. या मिश्रणात ठेचलेलं आलं आणि लसून घाला.

५. यानंतर यात हळद. लाल तिखट आणि धने-जिरे पावडर घालून चांगले परतवून घ्यावे.

६. शेवटी टॉमोटो आणि चवीसाठी मीठ घालून परतवून घ्यावे.

७. ही भाजी ५ ते १० मिनिटे फक्त वाफेवर झिजवून घ्यावे. (टिप- यात जास्त पाणी घालण्याची गरज नसते.)

८. ५ ते १० मिनिटांनी मूग झिजलेत का पाहून त्यात शेंदाण्याचा कुट आणि बारीक चिरलेली कोथंबिर घालून भाजी पुन्हा एकदा परतावी.

९. तेल न वापरता तयार झालेली भाजी भाकरी -चपातीसोबत खा. ( moong kobi bhaji )

हेही वाचा : 

 

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा