Healthy Food : चपातीचं पोषणमूल्य वाढवायचं आहे? मग गव्हाच्या पिठात हे पदार्थ जरूर मिसळा | पुढारी

Healthy Food : चपातीचं पोषणमूल्य वाढवायचं आहे? मग गव्हाच्या पिठात हे पदार्थ जरूर मिसळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Healthy Food : भारतीय आहारात रोटी, चपाती या पदार्थाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दक्षिण आणि पूर्वोत्तर भारत वगळता संपूर्ण भारतात रोटी किंवा चपाती आवर्जून खाल्ली जाते. भाजी, डाळ आणि इतर पदार्थासोबत खाऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का ? चपाती पोट भरण्याचं काम करतेच. पण अनेक गुणांनी समृद्धही असते. गहू किंवा गव्हाची चपाती हा फायबरचा उत्तम सोर्स असतो. त्यामुळे पचनसंस्थेच काम अतिशय उत्तम प्रकारे चालते. चपातीमधून मिळणारी ऊर्जाही शरीरासाठी अतिशय महत्त्वाची आणि जास्त काळ चालणारी असते. चपातीचं पोषणमूल्य नेहमीपेक्षा वाढवणं शक्य आहे. या काही सोप्या टिप्स वापरुन हे अगदी सहज साध्य करता येते.

Healthy Food : चपातीमध्ये रागी, सोयाबीन, बेसन हे मिसळून त्याच पोषणमूल्य वाढवता येऊ शकतं. यामुळे गव्हातील फायबरची क्षमता वाढते. परिमाणी शरीराला त्याचा चांगला फायदा होतो.

उत्तम चपातीसाठी शक्यतो प्रक्रिया केलेल्या गव्हापेक्षा पूर्ण आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले गहू वापरा.

Healthy Food : विशिष्ट डायटवर असाल तर चपातीला तेल किंवा तूप लावणं टाळा.

Healthy Food : अनेकदा मुलं पालेभाज्या खाण्यास कंटाळा करतात त्यामुळे पालेभाज्यांमुळे मिळणाऱ्या फायद्यापासून ते वंचित राहण्याची शक्यता असते. अशावेळी गव्हाच्या कणकेत या भाज्या मिसळून तुम्ही पराठे बनवू शकता.

पोषणाचे आगार : 

वर सांगितल्याप्रमाणे चपाती फायबरचा सर्वोत्तम स्त्रोत आहेच. पण याशिवाय त्यात विटामीन बी, ई ही जीवनसत्व तर कॉपर, जिंक, आयोडीन, पोटाशियम आणि कॅल्शीयम ही पोषणमूल्य असतात.

Healthy Food : डायटिंगमधील मित्र :

डायट करणाऱ्या व्यक्ती अनेकदा चपाती टाळताना दिसून येतात. पण तुम्हाला माहिती आहे का ? चपाती कमी कॅलरीमध्ये उत्तम पोषणमूल्य देणारं अन्न आहे. चपातीला तेल किंवा तूप न लावता डायट फूड म्हणून खाणं सहजशक्य आहे.

आता चपातीचा एक अविश्वसनीय फायदा म्हणजे उत्तम प्रतीच्या चपातीमुळे त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते. चपातीमध्ये असलेल्या मिनरल्स आणि झिंकमुळे त्वचेचा पोत सुधारतो.

spicy food : झणझणीत जेवणामुळे तुटल्या बरगड्या!

Food For Winter: थंडी सुरू झाली…. ही फळे आणि फळभाज्या खा!

Back to top button