

बीजिंग : अतिप्रमाणात व्यायाम करणे, खाण्यापिण्याच्या सवयी सतत बदलत राहणे (spicy food) हे किती धोकादायक असू शकते हेच एका महिलेसोबत घडलेल्या प्रकारावरून लक्षात येत आहे. चीनमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. कारण, जेवता जेवता एकाएकी तिच्या चार बरगड्याच तुटल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
चीनमधील स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार शांघाय प्रांतात राहणार्या हुआंग नावाच्या या महिलेने काही दिवसांपूर्वी तिखट, झणझणीत पदार्थ (spicy food) खाल्ला होता. त्याचवेळी ती मोठमोठ्याने खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिने याकडे लक्ष दिले नाही; पण काही वेळानंतर जेव्हा बोलण्यास आणि श्वास घेण्यास अडचण जाणवू लागली तेव्हा मात्र तिने डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांच्या सांगण्यावरून या महिलेने सिटी स्कॅन केले आणि त्यामध्ये जी माहिती समोर आली ते पाहून तिच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण, या महिलेच्या 4 बरगड्या एका अनपेक्षित घटनेमुळे तुटल्या होत्या. हे सर्व खोकल्याच्या अटॅकमुळे म्हणजेच सतत खोकला येत असल्यामुळे झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलं. ज्यानंतर या महिलेवर संबंधित उपचारही करण्यात आले. (spicy food) या महिलेवर उपचार करणार्या डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलेची उंची 5 फूट 6 इंच, तर वजन तुलनेने कमी होते. तिच्या बरगड्याही स्पष्टपणे दिसत होत्या ज्यामुळे हे संकट ओढवले. दरम्यान, हुआंगवर योग्य वेळी उपचार झाल्यामुळे आता ती पुन्हा एकदा पुर्वीसारखे आयुष्य जगू शकेल.
हेही वाचा :