आता नाश्त्याला बनवा झटपट आणि स्पॉंजी खमण ढोकळा. वाचा पूर्ण रेसीपी

Khaman Dhokla
Khaman Dhokla
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सकाळ झाली की किचन मधून पोहे, उपमा, शिरा या पदार्थांचे सुवास यायला लागतात. परंतु रोज तेच तेच पदार्थ खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. सकाळचा नाश्ता छान झाला की दिवस ही छान जातो. त्यामुळे नाश्त्याला नवनविन पदार्थ बनवायला हवेत. आज आम्ही तुम्हाला अगदी स्वीट होममध्ये मिळतो तसा झटपटीत खमण ढोकळा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

सर्विंग्स- 3
कॅलरीज- 75
खाद्यसंस्कृती- भारतीय

साहित्य

बेसन पीठ ( चाळून घेतलेलं ) – 1 वाटी, मोठा रवा – 3 टिस्पून, पाणी – 1 कप, पीठी साखर – 1 टिस्पून, इनो किवां बेकिंग पावडर – 1 टिस्पून, मीठ – चवीनुसार, हळद – 1/4 टिस्पून, निंबू चा रस – 1 टिस्पून, तेल – 1 टे. स्पून, मोहरी – 1 टिस्पून, कडीपत्ता – 3-4 पाने, हिरव्या मिरच्या – 3-4, साखर – 2 टिस्पून

कृती

• सर्वप्रथम एका बाउल मध्ये बेसन पीठ, मोठा रवा ,पीठी साखर, इनो, मीठ यांचे मिश्रण करून घ्या. मिश्रण तयार झाल्या नंतर त्यात हळद घाला.
• आता मिश्रणात थोडे थोडे पाणी टाकून मोठ्या चमच्याने फेटून मध्यम पातळ मिश्रण तयार करा. त्यात लिंबाचा रस घालून आणखी 2 मिनिटे फेटून घ्या.

• आता कडई मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. आणि ढोकळा बनवण्यासाठी एक पसरट डबा(कुकरच्या डब्या सारखा) घ्या व त्याला आतून सर्व बाजूने तेल लाऊन, मिश्रण त्या डब्ब्यामध्ये ओता.
• पाणी गरम झाल्यावर या डब्ब्याला कडई मध्ये ठेवून 10 मिनिटांसाठी झाकन ठेवून मध्यम आचेवर वाफून घ्या.

• 10 मिनिटे झाल्यानंतर ढोकळा वाफलेल्या आहे कि नाही हे पाहण्यासाठी ढोकळ्यामध्ये चाकू किंवा टूथपीक घाला. जर मिश्रण चाकूला चिकटलेला नसेल तर याचा अर्थ ढोकळा छान वाफवला गेला आहे. मिश्रण चिकटलेले असेल तर आणखी 3-4 मिनिटे वाफवून घ्या.
• आता ढोकळा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. आता पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्या नंतर त्यात मोहरी, कडीपत्ता, हिरव्या मिरचीचे टुकडे टाकून फोडणी तयार करा आणि त्यात 1 वाटी पाणी टाकून उकळी येवू द्या .

• उकळी आल्यावर साखर, लिंबाचा रस आणि चवी नुसार मीठ घातले की फोडणी तयार झाली. आता ढोकळा ज्या डब्ब्यात आहे त्याचा चारू बाजूनी चाकू फिरवून ढोकळा डब्यातून सैल करा. डबा उलटा करून एका पसरट ताटात ढोकळी काढून घ्या आणि त्याचे चौकोनी काप करून घ्या.
• आता या ढोकळ्यावर फोडणी घातली कि तयार झाला आपला खुसखुशीत खमण ढोकळा. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि हा ढोकळा पुदिना किंवा चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news