Silver pomfret | ‘सिल्व्हर पापलेट’ महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ घोषित! हा मासा का आहे महत्त्वाचा?

Fish SilverPofret
Fish SilverPofret
Published on
Updated on

'सिल्व्हर पापलेट' हा मासा महाराष्ट्राचा 'राज्यमासा' म्हणुन घोषित करण्यात आला आहे. सिल्व्हर पापलेटला यापुढे महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणुन ओळखला जावा, अशी घोषणा राज्याचे वन, सांस्कृतीक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय परिषदेत केली. काल (दि.०५) मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील परिषदेत मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. या संदर्भातील माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत 'X' (ट्विटरवरून) अकाऊंटवरून दिली आहे. (Fish Silver pomfret)

मुंबईतील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ऑगस्टच्या मध्यावर मच्छीमारांनी 'सिल्व्हर पापलेट' हा मासा राज्य मासा म्हणुन घोषित केला जावा अशी मागणी केली होती. जेणेकरुन त्याचे महत्त्व लक्षात घेऊन संवर्धनाच्या कामात हातभार लागेल. या प्रतिक्षित घोषणेमुळे कोळी बांधव आणि मत्स्य व्यावसायीकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (Fish Silver pomfret)

Silver pomfret : सिल्व्हर पापलेट महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा का आहे?

मत्स्य प्रेमींसाठी चवीला अत्यंत आवडीचा असणारा हा मासा आहे. तसेच या माशामध्ये प्रथिने ही मोठ्या प्रमाणात असतात. प्रामुख्याने पश्चिम किनाऱ्यालगत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या या माशांच्या चालणाऱ्या व्यवसायातुन अनेक मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालतो. हा मासा उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असल्यामुळे अनेक कोळीबांधवांचे आर्थिक गणित त्यावर अवलंबून आहे.

त्याचबरोबर, सिल्व्हर पापलेटची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. यातुन देशाला मोठा आर्थिक फायदाही होतो. असं असलं तरी, मागणी प्रचंड असल्यामुळे या माशाची मोठ्या प्रमाणावर मच्छीमारीही केली जाते. लहान असलेली पिल्ले किंवा गाभोळी असलेल्या मादी पापलेटं पकडल्यामुळे त्यांची नवीन पिढी निर्माण होत नाही. त्यामुळेच त्यांच्या संख्येत आता मोठी घट झाली आहे. यातुन त्याचे संवर्धन व्हावे यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळेच सिल्वर पापलेट हा मासा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

मच्छीमार सहकारी संस्थांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली होती मागणी

महाराष्ट्राच्या सागरी जलादी क्षेत्रातील महत्त्वाची "पापलेट" ही मस्त्य प्रजाती नामशेष होऊ नये यासाठी मच्छिमारांमध्ये प्रबोधन होणे तसेच पापलेटचे संवर्धन संरक्षण होण्यासाठी शासनस्तरावर नियमन होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून प्रयत्नाचा एक भाग म्हणून सिल्वर पॉमफ्रेटला (पापलेट/सरंगा) महाराष्ट्राचा "राज्य मासा" म्हणून घोषित करण्यात यावा. या मागणीचे आपल्या सातपाटी येथील मच्छीमार सहकारी संस्थांचे संयुक्त निवेदन मा. केंद्रीय व राज्य मत्स्य व्यवसाय मंत्री यांना सादर केले होते. त्यानुसार आजच्या कार्यक्रमात पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पालघर हा सागरी, डोंगरी आणि नागरी क्षेत्र असलेला जिल्हा. येथील मत्स्य व्यवसायावर उपजिविकेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अनेक स्थानिक, किनारपट्टीवरील मच्छीमार महिला/पुरुष तसेच डोंगरी भागातील आदिवासी बांधव अवलंबून आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा हा पारंपरिक मत्स्य व्यवसाय आहे. पण आज जागतिक तापमान वाढ व हवामान बदल, समुद्री प्रदूषण तसेच एलईडी, पर्ससीन, लाईन फिशिंग, कर्ली डोल या विनाशकारी पद्धतीने हव्यासापोटी अती मासेमारी या विविध कारणांनी समुद्राच्या पोटातील मत्स्य संपदा जैव विविधता इथले हेरिटेज संपुष्टात येऊन नष्ट होणाच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यातील मच्छीमार, मच्छीमार संस्था, संघटना मच्छीमारांचे विविध प्रश्न, मासेमारीचे नियमन, मत्स्य जतन संवर्धन याविषयी सातत्याने पाठपुरावा करीत असतात,परंतू अपवाद वगळता विधिमंडळात मच्छीमारांचे प्रश्न उपस्थित होत नाहीत. आपल्या जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी मच्छिमारांची बाजू हिरीरीने मांडल्याचे दिसून आलेले नाही.
-राजेंद्र मेहेर, मच्छीमार नेते

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news