

परळी, पुढारी वृत्तसेवा : धर्मद्रोही असलेल्या अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी हिंदुधर्मीय नागरिक व ब्राह्मण समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे. परळी-वैजनाथ येथील पोलिस ठाण्यात आंदोलकांनी ठिय्या धरला आहे. जोपर्यंत मिटकरींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत येथून उठणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
परळीतील शहरातील विठ्ठल मंदिर येथून मोठ्या संख्येने मूक मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन शहर पोलीस ठाण्यात आले. यानंतर पोलीस निरीक्षकांना अमोल मिटकरी याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर कारवाई करू असे, आश्वासनही यावेळी पोलिसांनी दिले. मात्र जोपर्यंत अधिकृतपणे एफ.आय.आर नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत पोलिस आम्ही ठाण्यातून हलणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.