पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेत आफ्रिकन देश मोरोक्कोने पोर्तुगालवर विजय मिळवल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिससह अनेक शहरांमध्ये दंगली उसळल्या आहेत(FIFA World Cup 2022). कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा 1-0 असा पराभव केला. (FIFA World Cup 2022).
यानंतर फ्रान्समच्या लिली, चॅम्प्स एलिसेस आणि एविग्नॉन या शहरांमध्ये तसेच दंगलखोरांनी जाळपोळ केली. पॅरिसमधील दंगलीदरम्यान मोरोक्कोच्या समर्थकांनी चक्क पोलिसांवरच हल्ला केल्याचे सामोर आले आहे. या घटनेचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हजारोंचा जमाव पोलिसांवर दगडफेक करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून दगडफेकीबरोबरच पोलिसांवर लाठ्याने हल्ला केला जात असल्याचे दिसत आहे. यादरम्यान सतत गोळीबाराचे आवाज व्हिडिओतून ऐकू येतात.
दंगलखोरांच्या हल्ल्यात मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे. या वेळी जमावाने वाहनांची तोडफोड केली. रस्त्यांवर विटा, दगड मोठ्या प्रमाणात विखुरलेले दिसले. पोलीस त्यांना रोखण्याचा सतत प्रयत्न करत होते, मात्र प्रचंड गर्दीमुळे त्यांनी माघार घेतल्याचे दिसत होते. विजयानंतर हजारो मोरोक्कन समर्थक रस्त्यावर उतरले आणि पॅरिसमधील प्रसिद्ध पॅरिस चौकात जमले. यावेळी त्यांनी मोरोक्कोचे झेंडे फडकवत घोषणाबाजी केली. एवढेच नव्हे तर वाहनांच्या हॉर्नने परिसर दणाणून सोडला. यानंतर जमावाने अचानपणे रस्त्यावरील वाहनांसह लगतच्या दुकानांची तोडफोडही केली.
याच काळात फ्रान्सने इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर फ्रेंच समर्थकही रस्त्यावर उतरल्याचे बोलले जात आहे. काही वेळातच गर्दी वाढली आणि रस्त्यावर गोंधळ उडाला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. यानंतर पोलिसांना अश्रुधुराचे नळकांडे सोडावे लागले.
फिफा विश्वचषक स्पर्धेत मोरोक्कोने प्रथमच उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला आहे. उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. उपांत्य फेरीचे सामने 13 आणि 14 डिसेंबरला होणार आहेत, तर अंतिम सामना 18 डिसेंबरला होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होणार आहे.
हेही वाचा