FIFA World Cup 2022 : सेमी फायनलमध्ये ‘या’ चार संघांची धडक, जाणून घ्या केव्‍हा येणार आमने-सामने

FIFA World Cup 2022 : सेमी फायनलमध्ये ‘या’ चार संघांची धडक, जाणून घ्या केव्‍हा येणार आमने-सामने

पुढारी ऑनलाईने डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने आता संपले आहेत.  (FIFA World Cup 2022) या विश्वचषकातही अनेक रोमांचक सामने पहायला मिळाले आहेत. सुपर १६ च्या फेरीनंतर उपांत्यपूर्व फेरीतही बराच उलटफेर पाहायला मिळले. इंग्लंड आणि पोर्तुगाल हे संघ विश्वचषकातून बाहेर पडल्‍याने चाहते अवाक झाले आहेत. सेमी फायनलमध्ये फ्रान्‍स, अर्जेंटीना, क्रोएशिया आणि मोरक्को या संघांनी धडक मारली आहे.

उपांत्यपूर्व फेरीमध्ये कोणत्या संघांनी मिळवला विजय?

) क्रोएशियाने ब्राझीलचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली (४-२)

२) अर्जेंटीना नेदरलँडविरुद्ध विजय मिळवत सेमी फायनलमध्ये दाखल झाली (४-३)

३ ) मोरक्को संघाने पोर्तुगालचा १-० ने पराभव करत सेमी फायनल गाठली

४ ) फ्रान्‍सने इंग्लंडचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली.  (२-१)

कधी रंगणार सेमी फायनल? (FIFA World Cup 2022)

१४ डिसेंबर – अर्जेंटीना विरुद्ध क्रोएशिया (रात्री १२.३०)

१५ डिसेंबर – फ्रांस विरूद्ध मोरक्को (रात्री १२.३०)

या दिवशी होणार तिसऱ्या स्थानासाठी सामना

सेमी फायनलमध्‍ये पराभूत झालेले संघांमध्‍ये तिसर्‍या स्‍थानासाठी १७ डिसेंबर २०२२ – रात्री ८.३० वाजता, खलीफा इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना होणार आहे.

अंतिम सामना

अंतिम सामन्‍यात धडक मारणार्‍या दोन संघांमध्‍ये १८ डिसेंबर २०२२ – रात्री ८.३० वाजता, लुसैल स्टेडियमवर विश्‍वचषकासाठी सामना होईल.

सर्व सामने स्पोर्ट Sports 18 वर पाहता येतील. (FIFA World Cup 2022)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news