FIFA WCup France Vs Denmark : डेन्मार्कला २ -१ फरकाने धूळ चारत फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत धडक

FIFA WCup France Vs Denmark : डेन्मार्कला २ -१ फरकाने धूळ चारत फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत धडक
Published on
Updated on

दोहा (कतार); पुढारी वृत्तसेवा : फ्रान्सने शनिवारी (26 नोव्हेंबर) कतार विश्वचषकाच्या गट 'डी'मध्ये डेन्मार्कचा पराभव केला. हा सामना 2-1 असा जिंकून त्याने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. फ्रान्सकडून युवा स्टार किलियन एमबाप्पेने दोन गोल केले. फ्रान्सचे दोन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. त्याचवेळी डेन्मार्कचा संघ या पराभवानंतर एका गुणासह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.(FIFA WCup France Vs Denmark)

गतविजेत्या फ्रान्सने नेत्रदीपक पद्धतीने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो पहिला संघ ठरला आहे. फ्रान्सकडून युवा स्टार किलियन एमबाप्पेने दोन गोल केले. डेन्मार्कविरुद्ध फ्रान्सने ६१व्या मिनिटाला आघाडी घेतली. स्टार स्ट्रायकर किलियन एमबाप्पेने पहिला गोल केला. थिओ हर्नांडेझच्या पासवर एमबाप्पेने शानदार गोल केला. एमबाप्पेने आपल्या 30व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 30 वा गोल केला. (FIFA WCup France Vs Denmark)

फ्रान्सच्या गोलला डेन्मार्कने झटपट उत्तर दिले. त्याने 68 व्या मिनिटाला गोल करून स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. डेन्मार्कसाठी आंद्रेस क्रिस्टेनसेनने गोल केला. यानंतर अटीतटीचा सामना चालू होता. वेळ संपत येऊ लागली होती त्यामुळे हा सामना अनिर्णित राहतो की काय असे वाटू लागले होते. तेव्हा फ्रान्सने 86 व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामन्यात पुन्हा एकदा आघाडी घेतली. यावेळीही संघासाठी किलियन एम्बापे धावून आला. (FIFA WCup France Vs Denmark)

मागील सामन्यात फ्रान्सने ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा पराभव केला होता. त्याचवेळी ट्युनिशियाविरुद्ध डेन्मार्कचा सामना अनिर्णित राहिला होता.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news