

दोहा; पुढारी ऑनलाईन : फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या दुसऱ्या दिवशीच्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या १० मिनिटात २ गोल डागत नेदरलँडने सेनेगलवर २ – ० अशा फरकाने विजय नोंदवला. या पहिल्या सामन्यात विजय मिळवत नेदरलँडने विजय आघाडी उघडली आहे. नेदरलँडकडून कोडी जॅक्पो आणि डेव्ही क्लासेन यांनी १ – १ गोल केला. सेनेगलने या सामन्यात अत्यंत चांगला प्रतिकार केला. पण, त्यांचा हा प्रतिकार त्यांचा पराभव टाळू शकला नाही. (FIFA WC Senegal vs Netherlands)
या विश्वचषकात पहिलाचा सामना तुल्यबळ संघात खेळला गेला. नेदरलँड आणि आफ्रिकन चँम्पीयन ठरलेला सेनेगलचा संघ सोमवारी एकमेकांशी भिडला. दोन्ही संघादरम्यान चांगला सामना प्रेक्षकांना पहायला मिळाला. सेनेगलने सुरुवाती पासूनच आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यांनी अनेक वेळा नेदरलँडच्या जाळ्यात गोल पोस्ट करण्याचा प्रयत्न केला. पण, नेदरलँडच्या गोलीकडून व चांगल्या प्रतिकाराच्या रणनीतीमुळे सेनेगलला गोल डागता आला नाही. नेदरलँडने तुलनेने सेनेगलपेक्षा चांगला डिफेन्स खेळ केला. दुसरीकडे नेदरलँडच्या संघाने जेव्हा जेव्हा आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा त्यांनी बॉलला सेनेगलच्या जाळ्यात पर्यंत पोहचवले. नेदरलँड सेनेगलच्या कमजोर डिफेन्सचा फायदा घेत दोन गोल डागण्यात यशस्वी झाले. (FIFA WC Senegal vs Netherlands)
सेनेगलने पूर्ण सामन्यात आपली पकड मजबूत ठेवली होती. पहिल्या हाफमध्ये कोणालाही गोल करण्याची संधी मिळाली नाही. पण, दुसऱ्या हाफमध्ये अगदी ८३ मिनिटापर्यंत हा सामना ड्रॉ होईल असे वाटत होते. पण, नेदरलँडचा प्लेअर ऑफ द ईअर ठरलेला कोडी जॅक्पो याने ८४ मिनिटाला हेडरच्या साहय्याने पहिला गोल डागला. यानंतर ९० मिनिटांचा खेळ संपल्यावर अधिक ८ मिनिटांचा खेळ वाढवून मिळाला. यावेळी अगदी सरतेशेवटी नेदरलँडच्या डेव्ही क्लासेनने नेदरलँडसाठी आणखी एक गोल डागत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. अखेर वेळ संपला आणि सेनेगलला हा सामना गमवावा लागला. पण, हा सामना सेनेगलच्या झुंजार खेळसाठी सुद्धा लक्षात ठेवला जाईल. (FIFA WC Senegal vs Netherlands)
अधिक वाचा :