Feeling angry : अतिराग भयंकर ‘ताप’ : ‘या’ ७ प्रसंगांमध्ये शांत राहिलेच पाहिजे…
पुढारी ऑनलाईन डेस्क : शांत राहण्याचे अनेक शारीरिक, मानसिक फायदे आहेत; पण दरवेळी आपलं मन हे शांत असेलच असं नाही. काहीवेळा आपल्या रागाचा पारा हा वाढत जातो. मात्र यामुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता असते. शांत मन अधिक क्रियशील आणि कृतीशील असं म्हटलं जात. शांत मनानेच कोणत्याही समस्येवर उपाय शोधता येताे.
रागावर नियंत्रण न राहिल्याने तुमचे नातेसंबध खराब होवू शकतात. असे सात प्रसंग आहेत जिथे तुम्ही शांत राहणं खूप गरजेचे असते, असे LinkedIn वरील इन्फ्लुएन्सर बिनू बी यांनी म्हटले आहे. जाणून घ्या अशा प्रसंगांविषयी… (Feeling angry )
Feeling angry : राग आल्यानंतर..
राग येणे खूप नैसर्गिक आणि स्वाभाविक गोष्ट आहे. राग हा आपल्या प्रगतीमधील काही अडथळ्यांपैकी एक; पण रागावर नियंत्रण न राहिल्याने आहे ती परिस्थिती आणखी वाढत राहते आणि ताण-तणाव निर्माण होतो. आणि तुम्ही तुमची शांतता गमवता. जर का तुम्हाला शांत राहायचं असेल आणि राग आला असेल. शांत राहण्याला अधिक प्राधान्य द्या.
कोणतीही माहिती नसताना व्यक्त होवू नका
एखाद्या घटनेचे पार्श्वभूमी माहित नसताना विनाकारण व्यक्त होवू नका. कोणतीही माहिती नसताना व्यक्त झाल्यास त्या घटनेचे गांभीर्य अधिक वाढू शकते. त्यामुळे व्यक्त होताना विचार करा. माहिती घेवून व्यक्त व्हा, अन्यथा शांत राहा.
नातेसंबंध दृढ होणार असतील तर मौन बाळगा
काही लोक कारण नसताना एखाद्या प्रसंगी व्यक्त होत असतात. त्यामुळे काहीवेळा नातेसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होवू शकतो. ते नातेसंबध खराब होवू शकतात. जर का तुम्ही मौन बाळगल्याने नातेसंबंध अधिक दृढ होणार असतील तर नक्की मौन बाळगण्याला प्राधान्य देवून शांत राहा.
तुमची मैत्रीसंबध खराब होणार असतील तर
जर आरडा-ओरडा करुन, रागात मोठ-मोठ्याने बोलून तुमचे मैत्री संबध घट्ट होण्याऐवजी जर का ते खराब होणार असतील तर शांत राहा.
जर कोणाला त्रास होणार असेल तर शांत राहा
जर तुम्ही रागाने, आरडा-ओरडा करुन कोणाला वाईट वाटणार असेल, त्याच्या भावनेला ठेच पोचणार असेल तर तुम्ही शांत राहण्याला प्राधान्य द्या.
भावनिक झाला असाल तर शांत राहा
भावनिक झाल्याने माणसाचे आपल्या निर्णयक्षमतेवरील आणि विचारांवरील नियंत्रण राहत नाही. भावनेच्या भरात आपण असंबंध बोलू शकतो. त्यामुळे ताण-तणाव वाढू शकतो. जर तुम्ही भावनिक असाल तर शांत राहण्याला प्राधान्य द्या
ओरडल्याशिवाय बोलता येत नसेल तर शांत राहा
काही लोक मोठ-मोठ्याने बोलतात. त्य़ांना साधी गोष्ट सांगायची असेल तर तिही ते मोठ्याने सांगत राहतात; पण समोरची व्यक्ती तुमचा सांगण्याचा उद्देश समजून घेईलच, असे नाही. त्यामुळे वातावरण बिघडू शकते.जर का तुम्हाला मोठ-मोठ्याने ओरडल्याशिवाय बोलता येत नसेल तर शांत राहण्याला प्राधान्य द्या.
हेही वाचा

